आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पीय अधिवेशन:लोकसभेत 34% तर राज्यसभेत 24.4% काम

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. यासोबत अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे केवळ ३४% आणि राज्यसभेचे २४.४% कामकाज होऊ शकले. संसद संस्थगित झाल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी विजय चौकात तिरंगा मोर्चा काढला.

केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितले की, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात एकूण ६ विधेयके मंजूर करण्यात आली. अधिवेशनात लोकसभेत एकूण ८ विधेयके मांडण्यात आली. गुरुवारी अधिवेशन सुरू होताच काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. विरोधक अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) मागणीवर ठाम आहेत.