आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Budget Session Rajya Sabha Proceedings Live Today 3 February : Ghulam Nabi Told The Government That Even The British Had To Bow In Front Of Farmers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा:'पगडी संभाल जट्टा' गाण्याची आठवण करून देत गुलाम नबी सरकारला म्हणाले - 'ब्रिटिशांनाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते'

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने तिन्ही कायदे रद्द करावेत, पंतप्रधानांनी स्वतः ही घोषणा केली तर बरे होईल : गुलाम नबी

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली. यासाठी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभाराच्या प्रस्तावावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेत अतिरिक्त वेळ समायोजित केला जाईल. आधी यावर 10 तास चर्चा होणार होती. मात्र आता बुधवार आणि गुरुवारच्या प्रश्न तास-शून्य तास मिळून एकूण 15 तास चर्चा होणार आहे. यादरम्यान 18 विरोधी पक्षांनाही शेतकऱ्यांच्या मुद्यावर बोलण्याची संधी मिळणार आहे.

गुलाम नबी म्हणाले- पंतप्रधान स्वत: कायदा मागे घेण्याची घोषणा करावी

राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी चर्चेला सुरुवात केली. ते म्हणाले की, "सरकारने तिन्ही कायदे रद्द करावेत. पंतप्रधानांनी स्वतः ही घोषणा केली तर बरे होईल. ब्रिटीश काळापासून शेतकर्‍यांचा संघर्ष सुरू आहे. ब्रिटीशांनाही शेतकर्‍यांसमोर झुकावे लागले. त्यांनाही शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागले."

‘पगड़ी संभाल जट्‌टा क्रांतिकारी गीत बनले’

गुलाम नबी म्हणाले की, "1906 मध्ये ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांविरोधात तीन कायदे तयार केले होते आणि त्यांचा मालकी हक्क घेतला होता. याविरोधात 1907 मध्ये सरदार भगत सिंह यांचे बंधू अजीत सिंह यांच्या नेतृत्वात पंजाबमध्ये आंदोलन झाले आणि त्याला लाला लाजपत राय यांचेही समर्थन मिळाले होते. संपूर्णी पंजाबमध्ये हे आंदोलन झाले. त्यावेळी एका वृत्तपत्राचे संपादक बांके दयाल यांनी पगड़ी संभाल जट्टा, पगड़ी संभाल वे कविता लिहिली होती, नंतर ते क्रांतिकारी गीत बनले होते. ब्रिटिशांना कायद्यात काही बदल करावे लागले. यामुळे लोक आणखीनच भडकले. त्यानंतर ब्रिटिशांनी ते तिन्ही कायदे रद्द केले."

बातम्या आणखी आहेत...