आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BUGS MIRROR Founder Aman Told 280 Mistakes To Google, GOOGLE Declared TOP Researcher

इंदूरचा तरुण GOOGLE चा टॉप रिसर्सर:अमनने काढल्या गुगलच्या 280 चुका, कंपनीने दिले 65 कोटी रुपयांचे बक्षीस

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूरचा तरुण अमन पांडेला गुगलने 65 कोटींचे बक्षीस दिले आहे. गुगलच्या 280 चुका शोधून अमनने बग रिपोर्ट पाठवला. अमन इंदूरमध्ये बग्स मिरर नावाची कंपनी चालवतो. गुगलने गेल्यावर्षी त्याच्या विविध सेवांवर बग नोंदवणाऱ्यांना 87 लाख डॉलरचे बक्षीस देऊ केले होते.

गुगलने आपल्या अहवालात इंदूरच्या अमनचा विशेष उल्लेख केला. गुगलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बग्स मिरर टीमचे अमन पांडे हे गेल्यावर्षी आमचे सर्वोच्च संशोधक होते.

2019 पासून बग अहवाल
Google ने सांगितले की, त्यांनी गेल्या वर्षी 232 बग नोंदवले. त्याने 2019 मध्ये प्रथमच आपला अहवाल दिला आणि तेव्हापासून त्याने Android व्हल्नेरेबिलिटी रिवॉर्ड प्रोग्राम (VRP) साठी 280 हून अधिक व्हल्नेरेबिलिटी नोंदवल्या आहेत.

अमनने भोपाळ एनआयटीमधून बीटेक केले आहे. 2021 मध्ये त्यांनी कंपनीची नोंदणी केली होती. अमनची कंपनी Bugs Mirror Google, Apple आणि इतर कंपन्यांना त्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत बनवण्यात मदत करते.

गुगलने लाखो डॉलर्सचे दिले आहे बक्षीस
गेल्या वर्षी, प्रोग्राम दरम्यान, 220 सुरक्षा अहवालांसाठी 2,96,000 डॉलर दिले होते. यावेळी क्रोम VRP अंतर्गत, 115 संशोधकांना 333 क्रोम सुरक्षा बगची तक्रार करण्यासाठी एकूण 33 लाख डॉलर देण्यात आले. यापैकी 33 लाख डॉलरमध्ये 31 लाख डॉलर क्रोम ब्राउझर सुरक्षा बगची तक्रार करण्यासाठी आणि 2,50,500 डॉलर क्रोम ओएम बगचा रिपोर्ट करण्यासाठी देण्यात आले.

Google Play 60 पेक्षा जास्त संशोधकांना 5,55,000 पेक्षा जास्त बक्षीस देते. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये Android VRP ने दुप्पट पैसे दिले आणि Android मधील शोषण साखळी शोधण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम 1,57,000 डॉलर इतकी आहे.

अमनने स्टार्टअप म्हणून सुरू केली हता कंपनी
अमनने त्याच्या कंपनी बग्स मिररबद्दल सांगितले की, आमची कंपनी जानेवारी 2021 मध्ये सुरू झाली आहे. व्यवस्थापन संघात सध्या चार जण आहेत. बाकीचे इंटर्न आहेत. ते म्हणाले की आम्ही स्टार्टअप म्हणून याची सुरुवात केली. अमन फक्त कामानिमित्त इंदूरमध्ये राहतो. बग्स मिररच्या यशाबद्दल टीम खूप उत्साहित आहे.

बातम्या आणखी आहेत...