आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bulandshahr Student Road Accident Death Case; Sudeeksha Bhaati Family Alleges Eve Teasing In Greater Noida

छेडछाडीमुळे हुशार विद्यार्थीनीचा मृत्यू:चहा विक्रेत्याची हुशार मुलगी होती सुदिक्षा, कठोर परिश्रमांनंतर अमेरिकेत 4 कोटींची शिष्यवृत्ती केली होती प्राप्त

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एचसीएलकडून चार कोटींची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर सुदिक्षा चर्चेत आली होती
  • कोरोना संकटामुळे जूनमध्ये अमेरिकेतून परतली होती, तिला 20 ऑगस्टला परत जायचे होते

ग्रेटर नोएडाच्या सुदिक्षा भाटीने स्वतःच्या मेहनतीने अमेरिकेत शिक्षण घेण्याचे यश संपादन केले होते. हे तिच्यासाठी सोपे नव्हते. चहा विकून वडील कुटुंबाचा सांभाळ करतात. सोमवारी दुपारी बुलंदशहर येथे मामाच्या घरी जात असताना रस्त्यात झालेल्या छेडछाडीमुळे तिचा मृत्यू झाला. सुदिक्षा ही दुचाकीस्वार रोड रोमियोपासून बचाव करत गाडीवरुन पळ काढत होती. तेव्हाच गाडीवरील ताबा सुटला आणि ती पडली. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

वडील म्हणाले- आज पुन्हा एक तारा तुटला
हुशार मुलगी गमावल्याच्या दु: खाने संपूर्ण कुटुंब हादरले आहे. वडील जितेंद्र भाटी चहाचा स्टॉल चालवतात. ते म्हणाले की आज एक तारा तुटला. मला पोलिसांकडून कोणताही न्याय नको आहे. माझ्या मुलीला न्यायाची गरज आहे. तिचा काहीच दोष नव्हता. अमेरिकेत जाण्यापूर्वी तिला तिच्या मामा आणि मामाची भेट घ्यायची होती. तिने आपले शिक्षण बुलंदशहरमधूनच पूर्ण केले होते.

2011 मध्ये सुदीक्षाच्या आयुष्यात झाला होता बदल

वडील म्हणतात की सुदिक्षाची 2011 मध्ये विद्या ज्ञान लीडरशिप अ‍ॅकॅडमी स्कूलमध्ये निवड झाली होती. तेथून तिचे जीवन बदलले. 2018 सीबीएसई परीक्षेत 98% गुण मिळवून बुलंदशहर जिल्ह्यात अव्वल आली होती.

20 ऑगस्टला तिला अमेरिकेत परतायचे होते

ऑगस्ट 2018 मध्ये ती अमेरिकेत गेली. ती अमेरिकेतील बॉबसन कॉलेजमध्ये बिझिनेस मॅनेजमेंटचा कोर्स करत होती. मागील वर्षी एचसीएलकडून तिला 3.80 कोटींची शिष्यवृत्ती मिळाली होती. सुदिक्षा जूनमध्ये भारतात परतली होती आणि 20 ऑगस्टला अमेरिकेत जाणार होती.

छेडछाड करत होते मुलं, वाचण्याच्या नादात बाइकवरुन पडली

सुदिक्षा तिचा भाऊ निगमसह मामाच्या घरी जात होती. बुलंदशहर-गढ महामार्गावर, एका बुलेटस्वारने वारंवार ओव्हरटेक करून तिला छेडण्याचा प्रयत्न केला. मुस्ताफाबाद गावात वळणाजवळ स्कूटीसमोर बुलेटस्वारने अचानक ब्रेक मारला असा आरोप सुदिक्षाच्या कुटुंबीयांनी केला. यामुळे स्कूटीवरील निगमचा ताबा सुटला. निगम आणि सुदिक्षा दोघे खाली पडले. यामध्ये सुदिक्षाचा मृत्यू झाला. तर भाऊ रुग्णालयात आहे.

बातम्या आणखी आहेत...