आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bull Attack In Uttar Pradesh Video Footage; Aligarh Gandhi Park | Children Injured | Bull Attack Video

4 वर्षांच्या चिमुरड्यावर वळूचा हल्ला, VIDEO:शिंगांनी मारले, तुडवले, मग वर बसला; बालकाची प्रकृती गंभीर

अलीगड, उत्तर प्रदेश23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीच्या अलीगढमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या 4 वर्षांच्या बालकावर मोकाट वळूने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये वळू एका बालकाला तुडवताना दिसत आहे.

CCTV मध्ये कैद झाली घटना

गुरुवारी सकाळी 7.40 वाजता अलिगढच्या धानीपूर मंडी परिसरात ही घटना घडली. बालक आजोबांसोबत फिरत असल्याचे CCTVमध्ये दिसत आहे. आजोबा मुलाला सोडून दुसऱ्या रस्त्यावर जातात, तेव्हा काही अंतरावर उभा असलेला एक वळू धावत येऊन मुलावर हल्ला करतो.

तो प्रथम मुलाला शिंगाने मारतो, नंतर त्याला तुडवतो आणि काही अंतरावर ओढतही नेतो. एवढेच नाही, तर त्यानंतर वळू बालकाच्या अंगावरही बसतो. या प्रकारानंतर आरडाओरड ऐकून आजोबा धावत आले आणि त्यांनी मुलाला खेचून बाहेर काढले.

मुलाला पायाने तुडवल्यानंतर वळू त्याच्या अंगावरही बसला.
मुलाला पायाने तुडवल्यानंतर वळू त्याच्या अंगावरही बसला.

CCTV फुटेज समोर आल्यानंतर महापालिका पथकाची कारवाई

घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर बैलाला पकडण्यासाठी पालिकेचे पथक धानीपूर भागात रवाना करण्यात आले आहे. यासह परिसरात फिरणाऱ्या इतर बैलांना पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून आजोबा आणि तेथून जाणारे लोक त्याला वाचवण्यासाठी धावले.
मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून आजोबा आणि तेथून जाणारे लोक त्याला वाचवण्यासाठी धावले.
बातम्या आणखी आहेत...