आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही महिन्यांत अतिरेकी आणि त्यांच्याबद्दल सहानूभूती दाखवणाऱ्यांवर जम्मू-काश्मीर प्रशासनाने कडक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. अतिरेकी निराश झाले असून त्यांनी अल्पसंख्याकांना टार्गेट करणे सुरू केले आहे. संरक्षण तज्ज्ञांनुसार, काश्मिरी पंडित, शीख आणि काही स्थलांतरित मुस्लिमांची ३२५ एकर मालमत्ता अतिक्रमणमुक्त केल्याचा गौप्यस्फोट नुकताच जम्मू-काश्मीर सरकारने केला आहे. १९९० मध्ये दहशतवादाच्या काळात स्थानिकांनी अतिरेक्यांना काश्मीरमधून पळण्यास भाग पाडले होते. तसेच त्यांची अब्जावधींची घरे व फळबागांसह इतर मालमत्तेवर कब्जा मिळवला होता. कब्जा हटवणे हाच अतिरेक्यांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. कारण काही मालमत्तांवर अतिरेकी व त्यांना सहानूभूती दाखवणाऱ्यांचाही कब्जा होता. सरकारला काश्मिरात पंडितांच्या जमिनी हडपण्याच्या ८००० तक्रारी मिळाल्या होत्या. पैकी बहुतांश तक्रारींचे निराकरण झाले. प्रशासनाने पंडितांची संपत्ती परत मिळवण्यासाठी समर्पित वेबसाइटही बनवली आहे.
दुसरीकडे जम्मू-काश्मीर सरकारने प्रथमच गेल्या आठवड्यात पुलवामामध्ये एका सक्रिय अतिरेक्याचे घर उद्ध्वस्त केले. हा अतिरेकी पाकव्याप्त काश्मिरात राहतो. त्याचा पुलवामा हल्ल्यातही सहभाग होता. अतिरेक्यांची इको सिस्टिम नष्ट करण्यासाठी अशी आणखी घरे तोडली जातील, असा संकेत सरकारने दिला आहे. आपली घरेही तोडली जाण्याची भीती सक्रिय अतिरेक्यांना आहे. तथापि, सुरक्षा दलांवरील हल्ला त्यांच्यासाठी आत्मघाती ठरतो. त्यामुळे ते सॉफ्ट टार्गेटच्या शोधात आहेत. काश्मिरात हिंदू सर्वात मोठे सॉफ्ट टार्गेट आहेत.
काश्मिरी पंडितांच्या नावांची यादी लीक, त्याद्वारेच धमकी देताहेत दहशतवादी
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी उत्तर काश्मिरात पंडितांसाठी बनवल्या जाणाऱ्या वसाहतीचा दैरा केल्याच्या एक दिवसानंतर अतिरेक्यांनी काश्मिरी पंडितांच्या वसाहतींचे कब्रस्तानात रूपांतर करण्याची धमकी दिली आहे. प्रतिबंधित ब्लॉग ‘द कश्मीर फाइट’वर द रेझिस्टन्स फ्रंटने (लश्कर-ए-तोयबाशी संबंधित) ही धमकी दिली. यामुळे २२० दिवसांपासून श्रीनगरात सुरक्षित निवास व नोकरीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या पीएम पॅकेजच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत आहे. वस्तुत: टीआरएफने नुकतीच ५६ पंडितांची काश्मिरात पोस्टिंगच्या ठिकाणांसह यादी जाहीर केली होती. त्यांनी यांना बेकायदा रहिवासी म्हटले आहे. एक ज्येष्ठ कर्मचारी रुबोन सप्रू यांनी दैनिक भास्करला सांगितले, अतिरेक्यांकडे ही यादी पोहोचलीच कशी? आम्ही खोऱ्यातून दूर जावे म्हणून प्रशासनात बसलेले अतिरेक्यांचे समर्थकच ही यादी लीक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
काश्मिरी पंडित ठाम; म्हणाले, आम्ही झुकणार नाही
अतिरेक्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही. आमचा संघर्ष सुरूच राहील, असे श्रीनगरमध्ये उपोषणाला बसलेले काश्मिरी पंडित म्हणाले. नावांची यादी कशी लीक झाली याचा तपास करत जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी काश्मिरी पंडितांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.