आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अति महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया ७५% पूर्ण झाली आहे. गुजरातने या प्रकल्पासाठी १००% जमीन संपादित केली आहे. महाराष्ट्रात आता केवळ २५% भूसंपादन शिल्लक आहे. येथेही भूसंपादनाची प्रक्रिया वेगवान केली आहे. अहमदाबादमध्ये केवळ तीन प्रकरणे न्यायालयालयात आहेत. एका वर्षाच्या सुनावणीनंतर खटला निकाली लागला नाही. नवा भूसंपादन कायदा २०१३ अंतर्गत चांगला मावेजा मिळाला. गुजरातमध्ये १४१ लोक कोट्यधीश झाले. गुजरातने ५७०७ कोटी रुपये आणि महाराष्ट्राने २११० कोटी रुपयांचा मावेजा दिला आहे. बुलेट प्रकल्पासंदर्भात अहमदाबादेतील जमिनीपैकी ९७% जमीन कब्जा अहमदाबाद जिल्हाधिकाऱ्याने नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पाेरशकडे सोपवला आहे.
टर्मिनल हबची निर्मिती सुरू, काली-चैनपूरमध्ये मेंटेनन्स डेपो
अहमदाबाद-मुंबईदरम्यान बुलेट ट्रेनच्या १२ स्थानकांमध्ये साबरमती-कालापूरमध्ये टर्मिनल हबचे बांधकाम सुरू आहे. स्थानकांसाठी कॉरिडॉर तयार होत आहे. मेंटेनन्स डिपो काली गाव-चैनपूर गावात ८३ हेक्टर क्षेत्रात साकारले जाईल. त्यासाठी १३.१२ जमीन जमीन मालकांकडून खरेदी केली.
२० मिनिटांच्या अंतराने रेल्वे
सकाळी ६ ते रात्री १२ दरम्यान पीक अवर्समध्ये २० मिनिटांच्या फरकाने रेल्वे चालेल. नॉन पीक अवर्समध्ये रेल्वेची उपलब्धता ३० मिनिटांनी.
गुजरातमध्ये सर्वात जास्त ३५१ किमीचा मार्ग, २ स्थानके अहमदाबादेत
अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेनचा २८.२७३ किमी मार्गासाठी ४७.५५ हेक्टर जमीन भूसंपादित केली आहे. हे भूखंड जिल्ह्यातील १० गावांत आहेत. ही गावे- बारेजडी, देवडी, गेरतपूर, रोपडा,विंजोल, असारवा,शाहीबाग, साबरमती(अचेर), काली गाम आणि चैनपूर. अहमदाबादमध्ये १४१ जमीन मालकांकडून २७.१५ हेक्टर जमीन खरेदी केली. अहमदाबादेत प्रकल्पग्रस्तांना ११०८ कोटी मावेजा दिला.
केंद्रशासितसह ३ राज्यांत १२ स्थानके
बुलेट ट्रेनचा १५४.७६ किमी हिस्सा महाराष्ट्रात आहे. २ किमी हिस्सा केंद्रशासित दादरा नगर हवेलीतून जातो. सर्वात जास्त गुजरातमध्ये ३५१ किमीचा मार्ग निर्माण होईल. अहमदाबादहून मुंबईच्या मार्गात एकूण १२ स्थानके असतील. यापैकी दोन स्थानके अहमदाबादमध्ये (साबरमती) होत आहेत. बुलेट ट्रेनची ऑपरेशनल स्पीड ताशी ३२० किमी निश्चित केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.