आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली पोलिसांची कारवाई:Bulli Bai App बनवणाऱ्या मुख्य मास्टरमाईंडला आसाममध्ये अटक, दिल्ली पोलिसांनी नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला घेतले ताब्यात

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

Bulli Bai App तयार करणाऱ्या प्रमुख आरोपीला दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटकडून अटक करण्यात आली आहे. आसाममध्ये त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. डीसीपी केपीएस मल्होत्रा ​​यांच्या पथकाने या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव नीरज आहे तो हा गिटहब वरून अ‍ॅप बनवणारा प्रमुख आरोपी आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नीरजने Bulli Bai App गिथहब द्वारे बनवले होते.

गेल्या काही दिवसांपासून Bulli Bai App वरुन मोठा वाद सुरू आहे. मुस्लीम महिलांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून त्यांचे फोटो घेऊन ती बुली बाई या मोबाईल अ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर टाकून अपलोड करण्यात येत असल्याचे समोर आले होते. 1 जानेवारी रोजी हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आता नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला आसाममधून अटक करण्यात आली आहे. हाच तरुण या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती डीएसपी केपीएस मल्होत्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

यापूर्वी तिघांना अटक
Bulli Bai App प्रकरणामध्ये आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. यामधील पहिली अटक बंगळुरूमधून 21 वर्षाच्या विशाल कुमार झा या तरुणाला करण्यात आली होती. तो अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तर दुसरी अटक उत्तराखंडमधून एक 18 वर्षीय श्वेता सिंह नावाच्या तरुणीला करण्यात आली. ही तरुणी केवळ 12 पास असल्याची माहिती आहे. यानंतर मुंबई पोलिसांकडून 21 वर्षीय मयंक प्रदीपसिंह रावत यालाही अटक करण्यात आली होती. यानंतर आता आसाममध्ये नीरज बिष्णोईला ताब्यात घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...