आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bully Bai App Deal Case | Shweta Sing | Mumbai | Marathi News | Mumbai Update; Who Is Shweta Singh?

एका मास्टरमाइंडची आपबिती:वयाच्या 18 व्या वर्षीच बनली मुस्लिम महिलांची ऑनलाईन विक्री करणारी मास्टरमाईंड; बेड्या पडल्यानंतर सांगितली फिल्मी आपबिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम समाजातील महिलांची 'बुली बाई' या अ‍ॅप्सवरुन बदनामी करण्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. त्यात एका 18 वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या या तरुणीचे नाव श्वेता सिंह असे असून, पोलिसांनी तिला उत्तराखंडातील उधम सिंह नगर जिल्ह्यातून अटक केली आहे.

मुस्लिम महिलांची बदनामी प्रकरणात ही मुलगी मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. अटक केल्याची माहिती मिळताच या टोळीतील श्वेता व्यतिरिक्त सर्वांनी आपले मोबाइल बंद करुन ठेवले आहेत. मात्र श्वेताचा मोबाइल सुरुच होता. त्याचा पाठलाग करत मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमधून तिला अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे की, या अॅप्स प्रकरणात नेपाल, दिल्ली, महाराष्ट्र, बंगळुरू या राज्यासह अनेक प्रदेशांतील सुशिक्षित तरुण यात सामील असल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिस आता उर्वरित आरोपींचा तपास करत आहे. मुंबई पोलिसांनी याच प्रकरणात मयंक नावाच्या एका जणाला अटक केली आहे. पोलिसांनी विशाल झा या इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला देखील बंगळुरुतून काल अटक केली आहे.

संपुर्ण कुटुंबातील जबाबदारी अटक केलेल्या तरुणीवर
अटक केलेल्या 18 वर्षीय श्वेता सिंह हिच्या वडिलांचे गेल्या वर्षी कोरोना काळात निधन झाले होते. तर त्याच्या काही दिवसांपूर्वींच आईचे देखील कर्करोगाचे मृत्यू झाले होते. श्वेताला एक मोठी आणि एक लहान बहिण आहे. तर तिचा भाऊ सध्या शाळेत जातो.

श्वेता चालवायची फेक ट्विटर अकाउंट
श्वेताच्या बहिणीने वाणिज्य शाखेतून आपले शिक्षण पुर्ण केले आहे. श्वेता देखील इंजिनिअरिंग सीईटी परिक्षेची तयारी करायची. श्वेताने JattKhalsa07 नावाने एक फेक ट्विटर खाते तयार केले होते. त्याचे वापर श्वेता समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी तसेच आक्षेपार्ह फोटो आणि कमेंट करण्यासाठी वापरत असे. श्वेतासोबत आणखी काही जण तिच्या टोळीत असून, ते देखील श्वेताच्या विचारधारेवर चालतात.

नेपाळमधील आपल्या मित्राच्या सांगण्यावरुन करायची काम
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्वेता नेपाळमध्ये असलेल्या त्याच्या मित्राच्या सांगण्यावरुन हे काम करत होती. श्वेताच्या त्या मित्राचे नाव 'गियोऊ' असे असल्याचे बोलले जात आहे. मुंबई पोलिस आता नेपाळ पोलिसांशी संपर्क साधत आहे. या प्रकरणात आणखी काही जण असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी तिला उत्तराखंडातील उधम सिंह जिल्ह्यातून अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी श्वेताला पाच जानेवारीपर्यंत ट्रांजिट रिमांडमध्ये ठेवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी बंगळुरुतून अटक केलेल्या विशाल झाने श्वेता विषयी माहिती दिली होती. त्याआधारेच श्वेताला अटक करणयात आली आहे.

...म्हणून तीने घेतला निर्णय

आरोपी श्वेताचे वडिल एका खाजगी कंपनीत काम करायचे. तिच्या वडिलांना कमी पगार असूनही, ते आपल्या कुटुंबात सुखी होते. मात्र श्वेताच्या आईला कर्करोग होता त्यामुळे तिचे निधन झाले होते. तर त्याच्या काही दिवसांनंतर कोरोनाने पुन्हा श्वेताच्या वडिलांचे कोरोनामुळे मृत्यू झाला.

त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी श्वेता आणि तिच्या बहिणीवर येऊन ठेपली. तीन बहिणी आणि एका भावाचे शिक्षण करणे तसेच घर चालवणे यामुळे श्वेता नेहमी चिंतेत असायची. त्यामुळे श्वेताने महिलांची बदनामी करण्याचे काम सुरू केले. कमी कालावधीत जास्तीत जास्त पैसा कमावण्यासाठी श्वेताने बुली बाई या अॅपसोबत काम केले. त्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...