आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bully By App Block, IT Minister Said Police Action Will Be Taken; Muslim Women Including Shiv Sena MP Priyanka Had Complained

महत्त्वाची कारवाई:मुस्लिम महिलांच्या फोटोंचा लिलाव करणारे अ‍ॅप ब्लॉक, प्रियंका चतुर्वेदींच्या तक्रारीनंतर आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम महिलांचा लिलाव करणारे Bully By अ‍ॅपला आयटी मिनिस्ट्रीने ब्लॉक केले आहे. मुस्लिम महिला आणि अनेक राजकीय पक्षांच्या विरोधानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आयटी मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांना यासंदर्भात एक ट्विट केले होते. यानंतर वैष्णव यांनी शनिवारी रात्री उशिरा त्यांनी रिप्लाय करत अॅपला ब्लॉक केल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, पोलिस अ‍ॅपच्या डिव्हलपर्सवर कारवाई करण्याची तयारी करत आहेत.

वैष्णव म्हणाले की, सॉफ्टवेअर शेअरिंग प्रोग्राम हिट हबने Bully By ला ब्लॉक करण्याची माहिती दिली आहे. गिट हबचा वापर अ‍ॅप बनवणे आणि चलावणाऱ्यामध्ये करण्यात आला होता. आता कॉम्प्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम आणि पोलिस पुढच्या कारवाईची तयारी करत आहेत.

डेव्हलपर्सला शिक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे
प्रियंका चतुर्वेदी यांनी आयटी मंत्र्यांचे आभार मानले आणि म्हणाल्या- सर अशा साइट्स बनवणाऱ्यांना शिक्षा करणे देखील खूप महत्वाचे आहे. मला आशा आहे की गृह मंत्रालय आणि आयटी मंत्रालय मुंबई पोलिसांना सहकार्य करतील जेणेकरून गुन्हेगारांना पकडता येईल.

दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला
प्रियंका चतुर्वेदींच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याशिवाय याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशी तक्रार जर्नलिस्टने केली आहे. काही मुस्लिम महिलांसोबत जर्नलिस्टला या अ‍ॅपवर लिलावासाठी ठेवण्यात आले होते.

गेल्या वर्षी सुली डील्सवर झाला होता विरोध
बुली बाय अ‍ॅपला सुली डील्सचा क्लोन म्हणून ओळखले जात आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुली डीलवरुनही मोठा विरोध झाला होता. सुल्ली ती टर्म आहे, ज्याचा वापर दक्षिणपंथी आणि चरमपंथी मुस्लिम महिलांचा अपमान करण्यासाठी केला जातो. या दोन्ही प्रकरणांमध्ये कोणताही लिलाव करण्यात आलेला नसला तरी या अ‍ॅप्सचा उद्देश मुस्लिम महिलांना त्रास देणे, त्यांना लाजिरवाणे आणि अपमानित करणे हा आहे.

बातम्या आणखी आहेत...