आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Burning Mysterious Objects Seen In The Indian Sky; Claims To Be A Chinese Rocket | Marathi News

चेंग झेंग-5बी रॉकेट कक्षेत येताच पेटले?:भारतीय आकाशात दिसल्या जळत्या गूढ वस्तू; चिनी रॉकेट असल्याचा दावा, चंद्रपूरमध्ये कोसळले अवशेष?

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी रात्री साडेसातला महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातसह अनेक राज्यांतील आकाशात उल्कापिंडासारख्या जळत्या वस्तू दिसल्या. अमेरिकी शास्त्रज्ञांनी हे चिनी रॉकेटचे अवशेष होते, असा दावा केला. पृथ्वीकक्षेत आल्याने या रॉकेटला आग लागून ते कोसळल्याचे त्यांनी म्हटले.

चंद्रपूरमध्ये कोसळले अवशेष?

रात्री साडेसातला विदर्भ, मराठवाडा व खान्देशाच्या आकाशातून अचानक काहीतरी पृथ्वीवर पडताना उडालेले अग्निलोळ एखाद्या रोषणाईसारखे दिसू लागले. हे अवशेष चंद्रपूर परिसरात कोसळले असल्याचा दावाही काही लोकांनी केला. त्याचे छायाचित्रही व्हायरल झाले.

चिनी रॉकेट : फेब्रुवारीत चीनने चेंग झेंग-५बी हे रॉकेट सोडले होते. शनिवारी ते पुन्हा पृथ्वीकक्षेत आले. केंब्रिज येथील खगाेलतज्ज्ञ जोनाथन मॅक्डोवल यांनी हे रॉकेट पृथ्वीवर कोसळेल, अशी शंका व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...