आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडाला 7 तास बांधून पत्नीला मारहाण:सुंदर दिसते म्हणून कुणी जाळले कपडे; डॉक्टर पत्नीला पुरुषांवर उपचार करण्यास मनाई, संशय बनवतो गुन्हेगार

ऐश्वर्या शर्मा| नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानमधील बांसवाडा येथे एका नवऱ्याने पत्नीला झाडाला सात तास बांधून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झाले असे की, त्याने त्याच्या पत्नीला एका तरुणासोबत पाहिले होते. जे कृत्य त्याने आपल्या पत्नीसोबत केले, तेच कृत्य त्याने त्या तरुणासोबत केले. तसेच आरोपीने पत्नीला काठीने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या आधीही असे प्रकर घडले आहेत.

प्रश्न हा आहे की, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत भावनिक होणे गरजेचे आहे का? का फक्त पत्नीवर नवऱ्याचाच अधिकार असतो. जर ती कोणा व्यक्ती सोबत बोलत असेल, तर तुम्ही तिच्यावर का जळता किंवा तुम्ही तिच्याकडे संशयास्पद नजरेने का पाहता.

ती विव्हळत होती, पण तो तीचे बोलणे ऐकत नव्हता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांसवाड्याचा हा व्हिडिओ 29 जुलै रोजी उशिरा समोर आला. 24 जुलै रोजी आरोपीची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेली होती. वाटेत तिला तिचा जुना मित्र भेटला. त्याने महिलेला तिच्या सासूचे घर सोडण्यास सांगितले. यानंतर ही घटना घडली. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह 4 जणांना ताब्यात घेतले.

ऑथेलो सिंड्रोम या आजारामुळे जोडीदारावर होतो संशय

नोएडा येथील मेट्रो हॉस्पिटलमधील मानसोपचार तज्ज्ञ अवनी तिवारी यांनी वुमन भास्करला सांगितले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये जेलसीची भावना असते. पण यापुढे तो मानसिक आजार बनतो. अशी प्रकरणे दोन कारणांमुळे जास्त पहायला मिळतात. पहिला ऑथेलो सिंड्रोम आणि दुसरा मद्यपान. ओथेलो सिंड्रोममध्ये, त्याला असे वाटते की आपली पत्नी आपल्याला दगा देतेयो. म्हणून व्यक्ती भ्रमात राहते.त्याला असे वाटते की, हे फक्त माझ्या बाबतीतच घडते.

सिंड्रोमचे नाव शेक्सपियरच्या 'ऑथेलो' या नाटकावरून पडले

तसेच या सिंड्रोमचे नाव शेक्सपियरच्या 'ऑथेलो' या नाटकावरून पडले आहे. यामध्ये ऑथेलो नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली होती.

दारू पिऊन माणसाला होतात भास

जे लोक अधिक काळापासून मद्यपान करतात ते डाइल्यूशन ऑफ इन्फिडेलिटीचे बळी आहेत. म्हणजेच काय तर आपल्या पत्नीचे दुसऱ्या एका माणसासोबत अफेअर असल्याचे त्याला वाटते. मात्र काही जण याचे पुरावे दाखवून देखील त्यांचे नवरे त्यांच्या पत्नी वर विश्वास ठेवत नाही. अशी प्रकरणे भारतात जास्त प्रमाणात घडतात. आपला पण नवरा आपल्यावर देखील संशय घेईल का? याची भीती सतत महिलांना असते. म्हणून असे घडू नये यासाठी महिला या दोन्ही आजारांवर उपचार घेतात.

जगातील 55% महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहेत. स्रोत: जागतिक आरोग्य संघटना (WHO)
जगातील 55% महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहेत. स्रोत: जागतिक आरोग्य संघटना (WHO)

भूतकाळात तुमची फसवणूक झाली असल्यास तुमचा विश्वास बसत नाही

रिलेशनशिप काउंसलर डॉ. गीतांजली शर्मा सांगतात, जेव्हा एखादी व्यक्ती असुरक्षित असते, तेव्हा एखाद्या व्यक्तीवर मक्तेदारीची भावना निर्माण होते. भावनिक असण्याची अनेक कारणे असू शकतात. अनेकवेळा कोणाच्या तरी भूतकाळात अशी काही घटना घडलेल्या असतात किंवा फसवणूक झाली असते ज्यामुळे त्याचा कोणावर विश्वास बसत नाही.

कधी कधी जेलसी त्याला असे बनवतो. त्याच वेळी, एखाद्या व्यक्तीचे लहानपणी आई-वडील वेगळे झाल्यावर किंवा मुलाला प्रेम मिळाले नाही तर तो दुखावला जातो. मोठा झाल्यावर त्याचा जोडीदार दुसऱ्याजवळ जातो किंवा आपला जोडीदार आपल्या पासून दुर जाण्याची त्याला जास्त भीती असते. तर काही जणांना जास्त जवळीक होण्याची भीती असते. असे असल्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःमध्ये कमतरता दिसते आणि स्वतःवर विश्वास ठेवत नाही. जसे की आपण सुंदर नाही, जर तिला एखादा चांगला मुलगा भेटला तर ती आपल्याला सोडून जाईल.

ही समस्या बहुतेक जोडप्यांमध्ये दिसून येते

बहुतेक जोडपी एकमेकांबद्दल भावनिक असतात. डॉक्टर गीतांजली शर्मा म्हणतात की, मुले जास्त भावनिक असतात तर मुलींमध्ये जेलसीची भावना जास्त असते. अशाच विषयाशी निगडीत त्यांनी वुमन भास्करशी दोन प्रकरणे शेअर केली.

प्रकरण 1: पत्नी ऑफिसमध्ये काम करायची. ती ऑफिसला चांगली तयार होऊन जायची. नवऱ्याला तिचे सुंदर कपडे घालणे आवडत नव्हते. असे असल्यामुळे त्याने तिचे सगळे कपडे जाळले.

प्रकरण 2: एक महिला डॉक्टर आहे. जेव्हा ती कोणत्याही पुरुषावर उपचार करायची ते तिच्या नवऱ्याला आवडायचे नाही. तर त्याने तिला सांगितले की, तू यापुढे कोणत्याही पुरुषावर उपचार करायचे नाहीत.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2020 मध्ये 29,193 पैकी 3,031 हत्या बेकायदेशीर संबंधांच्या संशयावरून झाल्या आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2020 मध्ये 29,193 पैकी 3,031 हत्या बेकायदेशीर संबंधांच्या संशयावरून झाल्या आहेत.

82% महिलांची हत्या त्यांच्या जोडीदाराने केली आहे

युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइमनुसार, जगात दररोज 137 महिलांची त्यांच्याच कुटुंबियांकडून हत्या केली जाते. जवळपास 50 हजार महिलांसोबत हा प्रकार घडला, त्यापैकी 30 हजार महिलांची त्यांच्या साथीदाराने संशयावरून हत्या केली आहे. तर, 82% महिलांची हत्या त्यांच्या जोडीदाराने केली होती तर 18% महिलांनी त्यांच्या जोडीदाराची हत्या केल्याचे उघडकीस आले होते. मृत्यू झालेल्या 50 हजार महिलांपैकी सर्वाधिक 20 हजार महिला आशियाई देशांतील होत्या.

सेलिब्रिटीचांही यात समावेश

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हे मान्य केले आहे की, ते त्यांच्या जोडीदारच्या बाबतीत भावनिक आहेत. जोडीदारावर संशय आल्याने काहींनी त्यांच्यावर हात उगारला आहे.जेव्हा सलमान खान ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिपमध्ये होता तेव्हा तो तिच्याबद्दल खूप भावनिक झाला होता. त्यांचे ब्रेकअप झाले तरीही तो तिच्या मागे होता.

इतकेच नाही तर शाहरुख खानने एका मुलाखतीत गौरी खानबद्दल भावनिक असल्याचे सांगितले. याशिवाय रणवीर सिंह जेव्हा दीपिका पदुकोणच्या जवळ आला तेव्हा तो अनेकदा तिच्या चित्रपटांच्या सेटवर पोहोचला. हे कारण होते. सैफ अली खाननेही मीडियासमोर हे कबूल केले, जेव्हा कुणी करीनाच्या जवळ यायचे तेव्हा मला ते आवडायचे नाही.

बातम्या आणखी आहेत...