आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Students Dance In Burqa At Mangaluru College; St. Joseph's Engineering College | Burqa Dance Video

मुलांनी बुरखा घालून केला डान्स, चौघेही निलंबित:कॉलेजचा दावा- डान्स करणारे मुस्लीम समुदायाचेच विद्यार्थी

मंगळुरु2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळुरुच्या वामनजूर येथील एका कॉलेजमध्ये काही मुलांनी बुरखा घालून डान्स केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सेंट जोसेफ इंजिनीअरिंग कॉलेजने कारवाई करत चार विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. ही घटना कशी घडली, याचीही चौकशी कॉलेज व्यवस्थापन करत आहे.

मात्र, स्टेजवर नाचणारे विद्यार्थी मुस्लिम समाजाचे असल्याचा दावा कॉलेजने केला आहे. याबाबत कॉलेजने प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे.

काय आहे प्रकरण
मंगळुरुमधील सेंट जोसेफ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, बॉलिवूड गाण्यांवर डान्स परफॉर्मन्स सुरू होता. अचानक 4 मुलांचा ग्रुप बुरखा घालून स्टेजवर येतो आणि ते दबंग 2 च्या फेविकॉल गाण्यावर नाचू लागतात. या डान्सची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कॉलेजने लिहिलं आहे - ही कृती एकोपा बिघडवणारी
सेंट जोसेफ अभियांत्रिकी महाविद्यालयाने जारी केलेल्या प्रकाशनात म्हटले आहे- विद्यार्थी संघटनेच्या अनौपचारिक कार्यक्रमादरम्यान सादर केलेल्या नृत्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे नृत्य मुस्लिम समाजातील मुलांनीच केले आहे. तो नियोजित कार्यक्रमाचा भाग नव्हता. त्यामुळे डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. समाजातील एकोपा बिघडवणाऱ्या कोणत्याही कृतीला महाविद्यालय समर्थन देत नाही आणि कॅम्पसमधील प्रत्येकाला हे चांगले ठाऊक आहे.

बातम्या आणखी आहेत...