आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bus Purchase Case, CBI Inquiry Sanctioned, Delhi Lt Governor Action After Report

कार्यवाही:बस खरेदी प्रकरण, सीबीआय चौकशीस मंजुरी, दिल्लीच्या नायब राज्यपालांची अहवालानंतर कार्यवाही

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) १ हजार लो-फ्लोअर बस खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी परवानगी दिली आहे. यासंबंधीची तक्रार २२ जुलैला दिल्ली सरकारच्या विभागांचे मत जाणून घेण्यासाठी मुख्य सचिवांकडे कळवण्यात आली होती. मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात अनियमिततेचे संकेत दिले. त्यानंतर सक्सेना यांनी ही तक्रार सीबीआयकडे पाठवली. डीटीसीने पूर्वनियोजित पद्धतीने परिवहन मंत्र्यांना बस िनविदा व खरेदी समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्त केल्याचा आरोप होता. जूनमध्ये हा आरोप करण्यात आला होता. एक हजार लो फ्लोअर बीएस-४ आणि बीएस-६ बससाठी जुलै २०१९ मधील बोली आणि मार्च २०२० मध्ये लो फ्लोअर बीएस-६ च्या दुरुस्ती करारासाठी घेण्यात आलेल्या दुसऱ्या बोलीत घोटाळा आहे.

केजरीवाल भ्रष्टाचाराच पर्याय : भाजप प्रवक्ता गौरव भाटिया यांनी रविवारी आपवर टीका केली. आधी अबकारी धोरणात आता बस खरेदी घोटाळा झाला आहे. केजरीवाल आणि भ्रष्टाचार परस्परांसाठी पर्याय बनले आहेत. ते म्हणाले, मित्रांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांना डीटीसी बस निविदा व खरेदी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. केजरीवाल सरकारने बस खरेदीत ८७५ कोटी रुपयांत बस खरेदीचा सौदा केला. परंतु वार्षिक देखरेख कराराला खरेदी टेंडरशी जोडण्यात आले नाही. कारण काही महिन्यानंतर स्वतंत्र टेंडर काढण्यात आले. त्यात घोटाळ्याची शक्यता आहे, असा आरोप भाजप नेत्याने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...