आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • By July, The Government Will Buy 20 25 Crore Doses Of The Vaccine, With 10 Crore Doses Of Serum In June

लसींचे उत्पादन वाढणार:जुलैपर्यंत सरकार लसीचे 20-25 कोटी डोस खरेदी करणार, जूनमध्ये 10 कोटी डोस सीरमकडून मिळतील

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरमने आपली उत्पादन क्षमता वाढवली

देशातील अनेक राज्यात कोरोना व्हॅक्सीनची कमतरता भासत आह. पण, आता केंद्र सरकारने लसींबाबत मोठा निर्णय गेतला आहे. सूत्रांकडून रविवारी मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार जुलैच्या अखेरपर्यंत व्हॅक्सीनचे 20 ते 25 कोटी डोस खरेदी करणार आहे. यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आणखी 30 कोटी डोस खरेदी केले जातील. कोवीशील्ड लस तयार करणारी पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) जूनमध्ये सरकारला 10 कोटी डोस देईल.

SII ने आपली उत्पादन क्षमता वाढवली

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात SII ने म्हटले की, त्यांचे कर्मचारी अनेक आव्हानांचा सामना करुन चोवीस-चोवीस तास काम करत आहेत. मे महिन्यात आमची क्षमता 6.5 कोटी डोस तयार करण्याची होती. पण, जून महिन्यात आमची क्षमता वाढून 10 कोटी डोसपर्यंत पोहोचली आहे.

कंपनीचे डायरेक्टर ऑफ गव्हर्नमेंट अँड रेगुलेटरी अफेयर्स प्रकाश कुमार सिंह यांनी या पत्रात पुढे लिहीले की, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया नेहमी आपला देश आणि जगातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी करत आली आहे. आमचे CEO अदार पूनावाला यांच्या नेतृत्वात आमची टीम दिवस-रात्र काम करत आहे. ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात आम्ही उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देत आहोत.

बातम्या आणखी आहेत...