आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाल रिपोर्टर'ने केली शाळेची पोलखोल:म्हणाला - हजेरी घेऊन गायब होतात गुरुजी, वर्गात चारा, प्रांगणात गाजरगवत, शिकावे तरी कसे?

रांची4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील एका बाल पत्रकाराने आपल्या सरकारी शाळेच्या दुरवस्थेची पोलखोल केली आहे. प्रकरण जिल्ह्याच्या महगामा तालुक्यातील खिमयाचक स्थित शाळेचे आहे. या शाळेच्या एका माजी विद्यार्थ्याने थेट प्लॅस्टिकचा 'बूम' हातात घेऊन आपल्या शाळेच्या समस्यांचा पाढा वाचला. त्याच्या या रिपोर्टिंगमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

कोल्ड ड्रिंकच्या एका रिकाम्या बाटलीचा माइक हाती घेऊन 12 वर्षांच्या सरफराजने आपल्या शाळेची दुरवस्था चव्हाट्यावर आणली आहे. याचा एक व्हिडिओ उजेडात आला आहे. या व्हिडिओत सरफराज शाळेत सर्वत्र फिरून शाळेत शौचालयच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे तो सांगत आहे. एवढेच नाही तर या बाल पत्रकाराने शाळेत शिक्षकांची मनमानी सुरू असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. शिक्षक हजेरी घेऊन दिवसभर गायब होतात, असे तो म्हणाला.

वर्गाबाहेर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सरफराज.
वर्गाबाहेर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सरफराज.

शाळेत घाणीचे साम्राज्य, वर्गात गवत

वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओद्वारे सरफराज खानने दाखवले आहे की, शाळेत घाणीचे साम्राज्य आहे. शौचालयही नाही. वर्गात चाऱ्याचा ढिगारा असून, तो बाहेरून बंद करण्यात आला आहे. माध्यान्ह भोजनाची व्यवस्था असणाऱ्या खोलीतही सर्वत्र घाण पसरली आहे. स्वच्छतेअभावी शाळेच्या परिसरात गाजरगवत उगवले आहे.

क्लासरूमधील स्थिती दाखवताना सरफराज.
क्लासरूमधील स्थिती दाखवताना सरफराज.

शिकवणी होत नसल्यामुळे तयार केला व्हिडिओ

मी येथे शिकत होतो, तेव्हाही शाळेची हीच स्थिती होती. येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. आता माझा छोटा भाऊ येथे शिक्षण घेत आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. माझ्या भावासह येथे शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे.

बंद पडलेल्या हातपंप दाखवताना बाल पत्रकार.
बंद पडलेल्या हातपंप दाखवताना बाल पत्रकार.

शिक्षकांची धमकी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येथे शिकवणाऱ्या शिक्षकांनी सरफराजच्या घरी येऊन त्याला धमकावले. तसेच पुन्हा असे न करण्याची तंबीही दिली. सरफराज म्हणाला -माझ्या आईला धमकावण्याचा प्रयत्न झाला. व्हिडिओ उजेडात आल्यानंतर शाळेत सुधारणा झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...