आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुवनंतपुरममधील बायजूच्या कर्मचाऱ्यांना दिलासा:बायजूने केरळमधील 140 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय रद्द केला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची भेट घेतल्यानंतर लर्निंग अॅप BYJU'S ने 140 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा आणि तिरुअनंतपूरमधील सेवा बंद करण्याचा निर्णय बदलला आहे. तिरुअनंतपुरममधील BYJU च्या कर्मचाऱ्यांनी केरळचे कामगार मंत्री व्ही. शिवाकुट्टी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केल्यानंतर हा बदल झाला आहे. BYJU ने कोणतीही पूर्वसूचना न देता आपले टेक्नोपार्क कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले होते.

BYJU'S ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "केरळचे मुख्यमंत्री पी विजयन आणि BYJU चे संस्थापक बीजू रवींद्रन यांच्यात तपशीलवार चर्चा झाल्यानंतर आम्ही आमच्या TVM (तिरुवनंतपुरम) उत्पादन विकास केंद्राचे ऑपरेशन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदनात पुढे असे लिहिले आहे की, परिणामी, आमचे 140 सहयोगी या केंद्रातून काम करत राहतील.

बायजू 2500 कर्मचारी काढणार

दरम्यान BYJU's बायजू (Byju's) आपल्या 2500 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करीत असल्याने कर्मचाऱ्यांची माफी मागितली. कर्मचाऱ्यांना ईमेल लिहून या निर्णयाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना लिहलेल्या ईमेलमध्ये म्हटले की, नफा कमावण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. बायजूचा निरोप घ्यावा लागला त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटते. अशी भावना रवींद्रन यांनी इमेलमध्ये व्यक्त केली होती. येथे वाचा पुर्ण बातमी

रवींद्रनचे आई-वडील होते शिक्षक

दक्षिण भारतातील तटवर्ती गावातील रवींद्रनचे आई-वडील शिक्षक होते. रवींद्रन यांचे शाळेत मन रमत नव्हते. ते नेहमीच फुटबॉल खेळण्यासाठी जात असत. नंतर घरी येऊन अभ्यास करत होते. रवींद्रनने इंजिनिअरिंग पूर्ण करून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत करू लागले. त्यांच्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढली की, स्टेडियममध्ये एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे रवींद्रन एक सेलेब्रिटी शिक्षक बनले होते. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी शिकविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला. 2011 मध्ये त्यांनी ‘थिंक अँड लर्न’ची स्थापना केली. त्यानंतर 2015 मध्ये ‘बायजूज्’ नावाचे मुख्य ॲप त्यांनी सादर केले. रवींद्रन यांच्या पत्नी दिव्या गोकूळनाथ या कंपनीच्या सह-संस्थापिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...