आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंडेप्थभाजपच्या विजयाचे खरे हिरो-CR:पाटलांना जे जमले ते इतरांना नाही; मोदी, शहांनंतर चंद्रकांत पाटील नवे कुशल रणनीतीकार

निर्मल दवे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय झाला आहे. मतमोजणीत प्रारंभिक कल भाजपच्या बाजूने आहेत. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपने विरोधी पक्षांवर आघाडी घेतली. त्यानंतर 11 च्या सुमारास राज्यात सलग 7व्यांदा भाजपचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले.

'चंद्रकांत रघुनाथ पाटील' विजयाचे खरे हिरो

गुजरात भाजप संघटनेतील पेज कमितीला मजबूत करण्यात आले तर त्याचा थेट फायदा पक्षाला होईल, असा दावा गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत केला होता. त्यांनी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. अखेरिस विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा पेज कमिटीची खरी ताकद दिसून आली.

भाजपने प्रथम 151 जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. त्या आधारावर पाटील यांनी अचूक रणनीती आखत पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पेज कमिटीचा पहिला प्रयोग सूरत महापालिका निवडणुकीत करण्यात आला. सी आर पाटील यांनी यापूर्वीही या महापालिकेच्या निवडणुकीत पेज कमिटी मजबूत करून पक्षाला विजय मिळवून दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत पांढऱ्या पोशाखात सी आर पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत पांढऱ्या पोशाखात सी आर पाटील.

52 महिन्यांचे कठोर परिश्रम

भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी कोरोना काळातही सलग 52 महिने पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. पक्षाचे काम समाजात रुजवण्याचे काम केले. याचेही फळ त्यांना आता या निवडणुकीतील विक्रमी विजयाद्वारे मिळाले.

पाटील यांची राजकीय वाटचाल

भाजपने 20 जुलै 2020 रोजी गुजरातचे 13 वे प्रदेशाध्यक्ष म्हणून सी आर पाटील यांची नियुक्ती केली. यातून भाजपने पक्षाशी एकनिष्ठ व सक्षम कार्यकर्त्याला मोठी जबाबदारी देण्याचा स्पष्ट संदेश दिला. तत्पूर्वी, 1980 साली भाजपत प्रवेश केल्यानंतर पाटील यांनी 1995 ते 1997 व 1998 ते 2000 पर्यंत जीआयडीसीचे नेतृत्व केले होते. 2009 मध्ये नवसारी मतदार संघातून लोकसभेवर पोहोचले. त्यानंतर 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. 2019च्या निवडणुकीत त्यांनी सुमारे 6 लाख 89 हजार 668 च्या मताधिक्याने विजय संपादन केला.

20 जुलै 2020 रोजी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सी आर पाटलांनी अवघ्या 2 वर्षांतच पक्षाला एका नव्या उंचीवर पोहोचवले. 21 जुलै 2020 रोजी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पक्ष संघटना मजबूत केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यानंतर 28 जुलै 2020 रोजी सौराष्ट्रातून दौऱ्यांना सुरुवात केली. संघ कार्यकर्त्यांचा सल्ला ऐकण्यावर भर दिला. तसेच पक्ष कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यालाही प्राधान्य दिले. सौराष्ट्र, उत्तर गुजरात व मध्य गुजरातचे वादळी दौरे करून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाची पेरणी करण्याचे काम केले.

सी आर पाटलांनी 24 सप्टेंबर 2020 रोजी राज्यातील विधानसभेच्या 8 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पेज कमिटी स्थापन केली. या सर्व जागांवर भाजपचा भगवा फडकला. विशेषतः डांग सारख्या विधानसभा मतदार संघातही भाजपचा ऐतिहासिक विजय झाला. त्यानंतर झालेली राज्यसभेची निवडणूकही त्यांनी बिनविरोध काढण्याचा पराक्रम केला.

या कामगिरीनंतर पाटलांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यात त्यांनी पक्षाची उमेदवारी देण्यासाठी कठोर नियम लागू केले. विशेषतः 60 वर्षांवरील नेत्यांना व कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे भाजपचा 31 जिल्हा परिषद, 205 तालुका पंचाय व 75 नगरपालिकांतही ऐतिहासिक विजय झाला.

कोरोना काळातही चमकदार कामगिरी

कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच सी आर पाटलांनी 'सेवा ही संगठना'च्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कोविड केअर सेंटर व रुग्णालय सुरू करण्याचे आवाह केले. यामुळे भाजपला संकटात सापडलेल्या लोकांची मदत करता आली. गुजरात भाजपच्या राष्ट्रीय राजकारणाची प्रयोगशाळा आहे. त्यामुळे भाजपने गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यापासून संपूर्ण मंत्रीमंडळ बदलण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी व त्यांच्या मंत्रीमंडळाने 11 सप्टेंबर 2021 रोजी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर भूपेंद्र पटेलांनी 13 सप्टेंबर 2021 रोजी मुख्यमंत्रीपदी म्हणून पदभार सांभाळला. खांदेपालटाचा हा निर्णय यशस्वीपणे अंमलात आणण्यातही सी आर पाटलांची महत्वाची भूमिका होती.

नव्या भूपेंद्र पटेल सरकारपुढे राजधानी गांधीनगर महापालिकेची निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान होते. पण पाटलांनी या निवडणुकीतही पेज कमिटीचे रामबान औषध वापरून पक्षाला महापालिकेच्या 44 पैकी 41 जागांवर शानदार विजय मिळवून दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सी आर पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सी आर पाटील.

सी आर पाटील यांच्या नेतृत्वात केवडियात झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी सर्वच सदस्यांना टॅबलेट देण्यात आले. तसेच सूरतमध्ये झालेल्या दुसऱ्या कार्यकारिणीतही तंत्रज्ञानाचा पूरेपुर वापर करण्यात आला.

सी आर पाटील माजी पोलिस

नवसारीचे खासदार सी आर पाटील 2020 मध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चेत आहेत. त्यांचा जन्म 16 मार्च 1955 रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एदलाबादमधील पिंपरी अकाराउतमध्ये एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रघुनाथ पाटील व आईचे नाव सरूबाई पाटील होते. त्यांचे शालेय शिक्षण दक्षिण गुजरातमधील विविध ठिकाणी झाले. 1975 साली आपले वडील व आसपासच्या लोकांकडे पाहून ते गुजरात पोलिसांत भरती झाले.

सी आर पाटील यांनी 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
सी आर पाटील यांनी 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.

त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे 1984 ध्ये त्यांनी पोलिसांची एक संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही कृती वरिष्ठांना आवडली नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा मुद्दा सोडला नाही. त्यांनी सरकारी नोकरीवर पाणी सोडून संघर्षाचा मार्ग पत्करला. तेव्हा त्यांच्यातील नेतृत्वगुण पहिल्यांदा जगाला दिसले.

कोट्यधीश खासदाराचा कुटुंबाशीही जिव्हाळा

सी आर पाटील आपल्या कुटुंबासोबत.
सी आर पाटील आपल्या कुटुंबासोबत.

सी आर पाटील एक जबाबदार व्यक्तीही आहेत. त्यांना 3 मुली व 1 मुलगा आहेत. आपल्या व्यस्त राजकीय जिवनातून ते आपल्या कुटुंबासाठी मोकळा वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. ते सार्वजनिक जीवन व खासगी जिवन यात नेहमीच संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात.

सी आर पाटील आपल्या कुटुंबासोबत.
सी आर पाटील आपल्या कुटुंबासोबत.
बातम्या आणखी आहेत...