आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने रणनिती आखणे सुरू केले आहे. भाजपचे महासचिव आणि बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, 'जानेवारीपासून सरकार नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) लागू करू शकते. यावेळी त्यांनी ममता बनर्जी सरकारवर आरोप करत म्हणाले की, मनता यांना निर्वासितांबद्दल सहानुभूती नाही. सरकारने चांगल्या उद्देशातून शेजारील देशातून येणाऱ्या निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी CAA आणला आहे.'
ममता बॅनर्जींना बसू शकतो मोठा धक्का
पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी सरकारमधून राजीनामा दिलेले माजी मंत्री सुवेंदु सरकार भाजपमध्ये सामील होऊ शकतात. भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी याबाबत संकेद दिले आहेत. दुसरीकडे, ममता बनर्जीनेही या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. ममता शनिवारी म्हणाल्या होत्या की, ज्याला पक्षा सोडायचा आहे, तो जाऊ शकतो. पक्षाविरोदा कारवाया आम्ही सहन करणार नाहीत. सुवेंदु पश्चिम बंगालमधील मोठे नेता आहेत आणि त्यांचा मागील अनेक दिवसांपासून ममता बॅनर्जींसोबत वाद सुरू आहे.
ममता बॅनर्जी सरकार कोसळणार
भाजप खासदार अर्जुन सिंहंनी शनिवारी न्यूज एजेंसीला म्हटले होते की, जर सुवेंदु सरकार भाजपमध्ये आले, तर ममता सरकार निवडणुकीपूर्वीच कोसळेल. याचा अर्थ असाही लावला जात आहे की, अनेकजण तृणमुल काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील होऊ शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.