आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amit Shaha Corona Booster Dose And CAA Shah | Asked BJP Leaders To Prepare After Corona Prevention Booster Dose Is Completed

कायदा लागू करणार:कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस पूर्ण झाल्यावर सीएए, शहा यांनी भाजप नेत्यांना तयारी करण्यास सांगितले

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालचे भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी मंगळवारी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अधिकारी यांनी गृहमंत्र्यांशी नागरिकत्व कायदा(सीएए) लवकरात लवकर लागू करण्याची विनंती केली. यावर शहा म्हणाले, कोरोना लसीचा प्रिकॉशन डोस देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर सीएए लागू केले जाईल. सीएएसाठी नियम बनवल्यानंतर तो लागू केला जाऊ शकेल.

डिसेंबर २०१९ मध्ये संसदेद्वारे पारित अधिनियमाचे नियम निश्चित न झाल्यामुळे तो लागू केला नाही. केंद्र सरकारने कोरोना महामारीचा हवाला देऊन याच्या नियमावलीस विलंब झाल्याचे सांगितले आहे. अधिकारी यांनी शहा यांच्या भेटीनंतर सांगितले की, त्यांनी गृहमंत्र्यांना शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागी टीएमसीच्या १०० नेत्यांची यादी सोपवली आहे.

जवळपास ३ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नागरिकत्व कायदा(सीएए) लागू करणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे.

बातम्या आणखी आहेत...