आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे असेही साइड इफेक्ट:डेटा प्रोटेक्शन विधेयकासाठी नियुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षा, चार सदस्य आता मंत्री... कायदा लटकला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: मुकेश कौशिक
  • कॉपी लिंक

मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच मोठ्या विस्तारानंतर आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया कंपन्या आणि ई-कॉमर्स उद्योग समूहांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या फेरबदलामुळे त्यांच्या मार्गातील काटे आपोआप दूर झाले आहेत. त्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डेटा प्रोटेक्शन (माहिती संरक्षण ) कायदा बासनात गुंडाळला गेला आहे.

या विधेयकासाठी नियुक्त केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी लेखी आणि इतर चार सदस्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. दोन सदस्यांना तर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे नवाच संसदीय पेच निर्माण झाला आहे. एकूण २८ सदस्यांच्या या समितीने पूर्ण कोरोनाकाळात मीनाक्षी लेखी यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाचा मसुदा तयार केला होता. हा पूर्ण मसुदा सदस्यांना मिळाला नाही. तांत्रिकदृष्ट्या हा अहवालच तयार नाही. संसदीय परंपरेनुसार आता समितीचे नवे अध्यक्ष आणि चार सदस्य निवडले जातील. त्यात भावी अध्यक्ष समितीचा हा मसुदा जसाच्या तसा स्वीकारेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे समितीचे काम नव्याने सुरू होईल. अर्थात पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत नवा मुसदा तयार होणार नाही. हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित तो तयार होईल.

इनसाइड स्टोरी / रसायन मंत्री म्हणून औषधांच्या केलेल्या व्यवस्थापनामुळे दिले आरोग्य मंत्रालय
राष्ट्रपती भवनातून बुधवारी रात्री मंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा आरोग्यमंत्री म्हणून मनसुख मांडविया यांचे जाहीर झालेले नाव धक्का देणारे होते. कारण आरोग्यमंत्रिपदावरून हटवले गेलेले डॉ. हर्षवर्धन वैद्यकीय व्यावसायिक आहेत. सध्याच्या मंत्रिमंडळातही ६ डॉक्टर आहेत. तरीही मांडविया यांचे नाव का समोर आले? सरकार व पक्षातील जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे की, मनसुख मांडविया डॉक्टर नसले तरी भाजपमध्ये त्यांना फार्मा कंपन्यांचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. रसायने व खत मंत्रालय सांभाळताना त्यांनी आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवला. देशात रेमडेसिविरचा तुटवडा असताना त्यांनी त्याचे उत्पादन २४ तासांतच वाढवण्यासाठी उत्पादकांशी थेट संपर्क साधला. ब्लॅक फंगसच्या संकटाच्या वेळी मांडविया यांनी त्याचे औषध पोसाकोनजोलचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला. सरकारसमोर औषधांच्या पुरवठ्याचे आव्हान होते. आता रसायन मंत्रालय आणि कोरोना व्यवस्थापन आरोग्य मंत्रालयाकडे आहे. आता ही दोन्ही मंत्रालये एकाच मंत्र्याकडे आली आहेत.

गुजरात राजकारणासाठी तयारी
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे विश्वासू मानले जाणारे मनसुख मांडविया यांना गुजरातमध्ये मोठी जबाबदारी देण्यासाठी घडवले जात आहे. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना महत्त्वाचे मंत्रालय देण्यात आले. शक्तिशाली पटेल समुदायाचे मांडविया राज्यात मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती ठरू शकतात.

बातम्या आणखी आहेत...