आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cabinet Minister Swami Prasad Maurya Resigns | Marathi News | Yogi Adityanath Govt Cabinet Minister Swami Prasad Maurya Resigns Today

मौर्यांचा राजीनामा:योगी सरकारला मोठा झटका, कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्ये मोठी उलथापालथ झाल्याची बातमी समोर आली आहे. योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांच्याकडे चार विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. योगी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मौर्य हे श्रम आणि सेवायोजन व समन्वय मंत्री होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ते आता राज्यपालाची भेट घेणार आहे.

मौर्य यांनी आपल्या राजीनामा दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार, तरुण आणि लहान-लहान-मध्यम व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याच्या वृत्तीमुळे मी आपला राजीनामा देत आहे. असे कारण सांगत मौर्य यांनी कॅबिनेट मंत्री पदावरुन राजीनामा दिला आहे. सोबतच मौर्य लवकरच भाजपला देखील रामराम ठोकणार अशा चर्चांना देखील उधाण आले आहे. ते लवकरच समाजवादी पार्टीत पक्षप्रवेश करू शकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बातम्या आणखी आहेत...