आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजियात्रा आयडीमुळे विमानतळावर वाचेल अर्धा वेळ:कॅमेऱ्याने ओळख; प्रवाशांची माहिती 24 तासांमध्ये केली जाईल डिलीट

दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील विमानतळांवर चेहऱ्याची ओळख करणारे तंत्रज्ञान लागू झाले आहे. याला ‘डिजियात्रा’ असे नाव दिले आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा ४०% वेळ वाचेल. सुरक्षेच्या कटकटीतूनही मुक्ती मिळेल. यासाठी डिजियात्रा अॅप डाऊनलोड करून नोंदणी करावी लागेल.

प्रवाशांना विमान तिकीट बुक करतानाच डिजियात्रेचा पर्याय दिला जाईल. पर्याय निवडल्यानंतर प्रवासी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्टचा तपशील त्यात भरेल. नोंदणीनंतर हा तपशील विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सीआयएसएफच्या सिस्टिममध्ये स्टोअर होईल. यानंतर प्रवाशाला एक डिजियात्रा आयडी जारी केला जाईल. त्यानंतर पुढच्या वेळीही प्रवाशांना तिकीट बुक करायचे असेल तर त्यांना तो आयडी वापरावा लागेल. तसेच प्रवासी विमानतळावर पोहोचल्यानंतर त्याला विमानतळावरील डिजी गेटवर लागलेल्या यंत्रात पीएनआर नंबर टाकावा लागेल. हा नंबर टाकताच डिजी गेटवर लावलेला कॅमेरा उघडेल आणि चेहरा स्कॅन करेल. याच प्रक्रियेचे प्रत्येक ठिकाणी पालन करावे लागेल. यासाठी एखाद्या सुरक्षा रक्षकाकडे जाऊन तपासणीची गरज राहणार नाही. डिजियात्राचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना वारंवार नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. केवळ एकदा रजिस्ट्रेशन नंबर नोंद केल्याने त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची ओळख पटेल. ज्या विमानतळावर प्रवासी आपला प्रवास सुरू करतील तेथील सिस्टिममध्ये प्रवाशाचा संपूर्ण तपशील असेल. प्रवास सुरू होण्याच्या २४ तासांच्या आत त्या विमानतळावरून प्रवाशांचा संपूर्ण तपशील डिलिट केला जातो.

नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना रांगेत उभे राहण्याची तसेच चेक पॉइंटवर कागदपत्रे दाखवण्याची गरजही पडणार नाही. सध्या ही सुविधा घेणे अथवा देण्याचा निर्णय प्रवाशांसाठी ऐच्छिक असेल. आगामी काळात डिजियात्राला बोर्डिंग पासशी जोडले जाईल. या सिस्टिमद्वारे विमानतळावर प्रवाशांच्या ४० टक्के वेळेची बचत होईल. या सिस्टिममुळे अमेरिकेच्या अटलांटामध्ये प्रति विमान ९ मिनिटांची बचत झाली आहे.

पहिल्या टप्प्यात दिल्ली, बंगळुरू, वाराणसी विमानतळांवर सुविधा लागू नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी गुरुवारी दिल्ली, बंगळुरू, वाराणसी विमानतळावर डिजियात्रा अॅपची सुरुवात केली. ही सेवा देशांतर्गत प्रवाशांसाठी आहे. मार्च-२०२३ पासून इतर चार विमानतळांवरही डिजियात्राची सुरुवात होईल. सध्या ही सुविधा देशांतर्गत विमान प्रवाशांसाठी आहे. अंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ती लवकरच लागू केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...