आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, लष्कराने आपल्या महिला अधिकाऱ्यांकरिता प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या आता प्रत्येक टप्प्यावर पोहोचू शकतात, ज्यावर पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न आहे. लष्कर प्रमुखांना दिव्य मराठीने प्रश्न केला होता की, राष्ट्रीय संरक्षण अकादमीची महिलांसाठी दारे उघडल्यानंतर आता महिला अधिकारी आगामी काळात लष्कर प्रमुख बनू शकतात? जर होय, तर लष्कर या नवीन परिस्थितीसाठी स्वत:ची काय तयारी करत आहे.
याच्या उत्तरात जनरल पांडे यांनी सांगितले की, जुलैपासून एनडीएमध्ये १९ महिला कॅडेट आहेत. यातील १०, तर लष्करात सहभागी होण्यास उत्सुक आहेत. लष्करात सध्या १७०० महिला असून यातील ६०० हून अधिक महिलांना पर्मनंट कमिशन मिळले आहे. त्यांना पुढे जाण्याचे मार्ग पुरुषांच्या बरोबरीनेच खुले आहेत. मिलिटरी पोलिसांतही १७०० हून अधिक महिला अधिकाऱ्यांची भरती करत आहे. सैन्य पोलिसांत १०० महिलांची भरती करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर या वर्षापासून एनडीएमध्ये महिला कॅडेट्सच्या प्रवेशाची क्रांती झाली आहे. संरक्षण प्रतिष्ठानाने महिला कॅडेट्सची संख्या १९ पर्यंत मर्यादित ठेवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.