आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाईनच्या विमानाने एका कर्करोगग्रस्त (कॅन्सर) महिला रुग्णाला खाली दिल्ली विमानतळावरून उतरून दिले. मीनाक्षी सेनगुप्ता नावाच्या या कर्करोगग्रस्त महिलेने तिची बॅग ओव्हरगेड केबिनमध्ये ठेवण्यासाठी क्रूकडे मदत मागितली होती.
कॅन्सरमुळे ती कमकुवत झाली आहे. त्यामुळे बॅग उचलून ठेवण्याची तीने विनंती केली होती. परंतू त्यांना कोणीही मदत केली. त्याउलट क्रूने त्यांना सांगितले की, जर त्यांना त्यांच्या बॅग घेऊन जाता येत नसेल तर त्यांनी फ्लाइटमधून उतरून जावे.
मीनाक्षी सेनगुप्ता यांनी याप्रकरणी पोलिस व सिव्हिल एअरकडे तक्रार केली आहे. डीजीसीएने अमेरिकन एअरलाइनकडून या प्रकरणी खुलासा मागितला आहे. त्यानंतर एअरलाइनने स्पष्ट केले की, प्रवाशाने केबिन क्रूच्या सूचनांचे पालन करण्यास नकार दिला. ज्यामुळे त्याला फ्लाइटमधून खाली उतरावे लागले. प्रवाशी महिलेला तिच्या तिकिटाचे पैसे रिफंड केले जाणार आहे.
अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी तक्रार
अमेरिकेत राहण्याऱ्या मीनाक्षी सेनगुप्ता यांनी या प्रकरणी अमेरिकन एअरलाईन्सविरोधात अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या बॅगेचे वजन हे 5 पाउंड पेक्षा जास्त होते. हे सामान विमानाच्या केबिनमध्ये ठेवण्यासाठी तिने विमानातील क्रू मेंबरला मदत मागितली. मात्र, तिला मदत न करता संबंधित कर्मचाऱ्याने महिलेला विमानाबाहेर काढले. सिव्हिल एव्हीएशनचे डायरेक्टर जनरल अरुण कुमार म्हणाले, या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या प्रकरणाची अद्याप पुष्टी झालेली नाही.
अमेरिकन एअरलाईन्सने केला खुलासा
30 जानेवारी रोजी दिल्ली येथून उड्डाण करण्यापूर्वी एका महिला यात्रीला विमानातून खाली उतरवण्यात आले. संबंधित महिला ही क्रू मेंबरने दिलेल्या निर्देशांचे पालन करत नव्हती. सेनगुप्ता या सुट्टीसाठी भारतात आल्या होत्या. त्यांना कॅन्सर असल्याचे कळल्याने त्यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्या अमेरिकेला परत जात होत्या. सेनगुप्ता या व्हीलचेअर बसल्या होत्या. त्यांनी सांगितले की, ग्राऊंड स्टाफने त्यांची खूप मदत केली. त्यांना त्याच्या जागेपर्यंत त्यांनी सोडून दिले होते.
म्हणाल्या- सर्व परिस्थिती सांगूनही माझ्याशी चूकीची वागणूक
मीनाक्षी सेनगुप्ता यांनी सांगितले की, एअरहोस्टेसला माझी सर्व परिस्थिती सांगितली असतांनाही त्यांनी वाईट वागणूक दिली. विमान हवेत उड्डाण भरत असतांना विमानाची लाइट डीम झाली. यावेळी एका प्रवाशाने त्यांना बॅग वर ठेवण्यास सांगितली. या वेळी मी क्रू मेंबरला मदत करण्यास सांगितले, पण त्यांनी हे माझे काम नाही असे म्हणत मदत करण्यास नकार दिला. त्यांनी विमानाचा कॅप्टनला देखील मदत करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी सुद्धा मदत करण्यास नकार देत विमानातून उतरण्यास सांगितले. हा खूप वाईट अनुभव होता, असे सेनगुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.