आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात पुढील तीन वर्षांत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) हा दावा केला आहे. ICMR ने 2025 पर्यंत कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 12.7 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही वर्षांत भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कर्करोगाची वाढती आकडेवारी पाहता तज्ज्ञांनी हा दावा केला आहे.
भारतात परिस्थिती भयावह
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, 2020 मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 13.92 लाख (सुमारे 14 लाख) कॅन्सरची प्रकरणे होती, जी 2021 मध्ये 14.26 लाख झाली आणि 2022 मध्ये 14.61 लाख झाली.
रोग पसरण्याची मुख्य कारणे
तज्ज्ञांच्या मते, देशात केवळ हृदयविकार आणि श्वसनाचे आजारच नाही. तर कॅन्सरचे रुग्णही वाढत आहेत. कॅन्सरच्या वाढत्या प्रादुर्भावाला अनेक घटक कारणीभूत आहेत. ज्यात वाढते वय, जीवनशैलीतील बदल, व्यायामाचा अभाव आणि पौष्टिक आहार यांचा समावेश आहे.
बर्याच वेळा लोकांना कॅन्सरच्या लक्षणांबद्दल संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे हा आजार वेळेत ओळखला जात नाही आणि उपचारालाही उशीर होतो. लवकर उपचार न मिळाल्याने कॅन्सर वाढतच जातो. म्हणूनच लोकांमध्ये कॅन्सरबद्दल जागरूकता पसरवणे देखील खूप महत्वाचे आहे.
भारतातील पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग
गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार, भारतातील पुरुषांमध्ये तोंडाचा आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी, महिलांमध्ये सर्वाधिक प्रकरणे स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची होती.
बंगलोरस्थित ICMR नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR) च्या मते, 2015 ते 2022 पर्यंत सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या आकडेवारीत सुमारे 24.7 टक्के वाढ झाली आहे. 14 वर्षांखालील मुलांना लिम्फॉइड ल्युकेमिया, रक्ताशी संबंधित कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. कर्करोग टाळण्यासाठी त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
हा भयंकर आजार कसा टाळायचा
डॉक्टर सुहास आग्रे, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटूनकोलॉजिस्ट यांच्या मते, वृद्धत्व, कौटुंबिक इतिहास, अनुवांशिकता, लठ्ठपणा, तंबाखूचा वापर, मद्यपान, मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) सारखे विषाणूजन्य संक्रमण, वातावरणातील रसायने, प्रदूषण, हानिकारक अतिनील किरणांचा संपर्क. सूर्यप्रकाश, खराब आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही हार्मोन्स आणि बॅक्टेरिया ही या भयानक आजाराच्या प्रसाराची कारणे आहेत. हा आजार टाळण्यासाठी कर्करोगाची लक्षणे दिसू लागताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
डॉ. तन्वीर अब्दुल मजीद म्हणाले की, भारतात कॅन्सरची प्रकरणे वाढत आहेत. कर्करोग केवळ वृद्ध लोकांवर किंवा प्रौढांवरच परिणाम करत नाही. तर तरुणांनाही आपल्या कवेत घेत आहे. कर्करोगाचे वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास व्यक्तीचा मृत्यू होतो. भारतातील पुरुषांमध्ये मुख, फुफ्फुस, डोके आणि प्रोस्टेटिक कर्करोग हे सर्वात सामान्य कर्करोग आहेत. तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सर्वात सामान्य आहे.
तन्वीर अब्दुल मजीद पुढे म्हणाले, महिलांमध्ये अनेक कर्करोग चिंताजनकपणे वाढत आहेत. माझ्या मते, पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग हे तोंड, फुफ्फुस आणि घशाचे असतात. स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग महिलांमध्ये सर्वाधिक आढळतो. या कर्करोगांवर वेळीच उपचार केल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.
सुहास आग्रे म्हणतात, कर्करोग टाळण्यासाठी लोकांनी तंबाखू आणि दारूपासून दूर राहावे. संतुलित आहार घ्यावा आणि दररोज व्यायाम करावा. हिपॅटायटीस बी, मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) साठी लसीकरण करावे. नियमित तपासणी आणि प्रदूषणापासून दूर राहणे देखील महत्त्वाचे आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक इतिहासात हा आजार असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब तपासणी करून घ्यावी.
एकाच रक्त चाचणीतून 50+ कर्करोग शोधले जाऊ शकतात
जगभरातील आरोग्य तज्ज्ञ अशी तपासणी प्रक्रिया विकसित करण्यात गुंतले आहेत. ज्यामुळे एकाच वेळी अनेक प्रकारच्या कर्करोगाची तपासणी करता येईल. मल्टीकॅन्सर अर्ली डिटेक्शन (MCED) चाचणी यामध्ये आघाडीवर आहे. ही एकच रक्त चाचणी आहे जी, एकाच वेळी अनेक प्रकारचे कर्करोग शोधू शकते. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.