आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातेत बडोद्याच्या सयाजीगंज येथील आम आदमी पक्षाचे उमेदवार स्वेजल व्यास अनामत रक्कम भरण्यासाठी समर्थकांकडून १-१ रुपया गोळा करत आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या आवाहनानंतर केवळ दोन तासांत ९ हजार रुपये जमले. दोन समर्थकांनी तर ११ हजार आणि ५१ हजार पाठवले. मात्र स्वेजल यांनी त्यातील केवळ १-१ रुपयाच घेतला आणि बाकीचे पैसे त्यांना ऑनलाइन परत पाठवले. त्यांनी सांगितले की, जनतेच्या मदतीतून जमलेल्या पैशांनी मी अनामत रक्कम भरेन.’ त्यांचे समर्थक प्रत्येक सोसायटीत त्यासाठी डबा घेऊन फिरत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.