आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वी उत्तीर्ण झालेल्या युवकांसाठी बीएसएफमध्ये संधी:वय वर्षे 25 पर्यंतचे उमेदवार करु शकतात अर्ज; 81 हजारांपर्यंत असेल पगार

जयपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमा सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल, एएसआय आणि स्टेनोग्राफरच्या 323 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ज्यासाठी 12 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवार अर्ज करु शकतील. या पदांसाठी 27 ऑगस्ट 2022 पर्यंत बीएसएफची अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीसह लेखी चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

पगार

बीएसएफनुसार, सहाय्यक उपनिरीक्षकांच्या पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना लेव्हल-5 अंतर्गत 29,200 ते 92,300 रुपये पगार दिला जाईल. तर हेड कॉन्स्टेबल पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला लेव्हल-4 अंतर्गत 25,500 रुपये ते 81,100 रुपये पगार दिला जाईल.

पात्रता

323 पदांसाठी भरती प्रकियेत सहभागी होण्या-या उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासोबतच ASI स्टेनोग्राफरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 12वी उत्तीर्ण व्यक्तीला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे किमान वय 18 ते 25 वर्षे असावे. दुसरीकडे, इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षांची आणि अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि ईएसएममधील उमेदवारांनाही सरकारी नियमांनुसार सूट दिली जाऊ शकते.

शुल्क

भरती प्रकियेत सहभागी होण्यासाठी, सर्वसाधारण प्रवर्गातील, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. दुसरीकडे, गट क पदासाठी अर्ज करणार्‍या सर्वसाधारण प्रवर्गातील, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर इतर आरक्षित श्रेणी जसे SC, ST, ESM श्रेणी आणि BSF कर्मचारी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

बातम्या आणखी आहेत...