आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबाद:पित्याची ओळख पटवण्यासाठी स्त्रीवर सक्ती करू शकत नाही, दांपत्याच्या याचिकेवर गुजरात हायकोर्टाची टिप्पणी

अहमदाबाद / तेजल शुक्ल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळाचे वडील काेण आहेत हे सांगण्यासाठी एखादी तरुणी वा महिलेला तुम्ही सक्ती करू शकत नाही, असे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले आहे. बाळाच्या वडिलांच्या बाबतीत विचारण्यासाठी अल्पवयीन मुलीवर दबाव आणल्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाने ही टिपण्णी केली. या प्रकरणात मुलगी स्वत: आपल्याला पतीबराेबर राहायचे आहे. तिच्या बाळाचे वडील काेण आहेत हे सांगण्यास ती इच्छुक नाही. मग असे करण्यासाठी तिला कोणीही भाग पाडू शकत नाही. हे प्रकरण जुनागड येथे राहणारी मुलगी आणि तिच्या प्रियकराशी संबंधित आहे. मुलीला १८ वर्षांची होण्यासाठी एक दिवस उरला होता त्याच दिवशी (२४ मार्च २०२०) देशव्यापी लॉकडाऊन लागू झाला. मुलगी तिच्या प्रियकरासोबत घरी निघून गेली. दोघेही लग्न न करता एकत्र राहू लागले. अशा प्रकारे दोघेही कायदेशीर गोंधळात अडकले. दोघांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले. लॉकडाऊन उघडल्यावर मुलगी आठ महिन्यांची गर्भवती होती. कोणाचे मूल आहे हे सांगण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. लग्नानंतर एक महिन्याने मुलीने मुलाला जन्म दिला.

शहरांत लग्नाविना मुलाचा जन्म झाला तर माॅडर्न : हायकाेर्ट
कायद्यानुसार, २५ मार्च २०२० रोजी मुलगी लग्न करू शकत हाेती. पण याच्या एक दिवस आधी लॉकडाऊन लागू करण्यात आला. म्हणजेच तिला प्रौढ होण्यासाठी एक दिवस शिल्लक होता. न्यायालयाने म्हटले की तुम्ही तिच्यावर फक्त एका दिवसासाठी कायदा लादू शकत नाही. मुलीचे वडील तिच्यावर मुलाच्या वडिलांची ओळख उघड करण्यासाठी दबाव टाकत आहेत. पण स्त्रीला अशी सक्ती करता येत नाही. जर अविवाहित मुलाचा जन्म मोठ्या शहरांमध्ये झाला असेल तर अशा मुलीला माॅडर्न आणि ग्रामीण मुलीवर भारतीय दंडसंहितेची कलमे लावली जातात.

बातम्या आणखी आहेत...