आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाबा केदारनाथच्या दर्शनासाठी आतूर भाविकांचा जनसागर एक दिवस आधीच येथे विसावला आहे. या तिर्थस्थळाच्या हॉटेल-धर्मशाळेची जवळपास १० हजार भाविकांची क्षमता आहे. मात्र, गुरुवारी २० हजार भाविक दाखल झाले. हजारो भाविकांकडे निवास आणि भोजनाचीही व्यवस्था नाही. आता तंबूही मिळत नाहीत. गौरीकुंडहून हजारो भाविक गुरुवारी सकाळी केदारनाथ धामकडे निघाले. २१ किमी अंतर पायी, घोड्यावर किंवाखेचरवरून पूर्ण केले जात आहे. सकाळी ६ वाजता सुरू झालेला प्रवास सायं. ४ वाजता केदारनाथ धामवर पूर्ण झाला.
क्षमतेपेक्षा जास्त भाविक पोहोचल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हॉटेलांतील खोल्यांचे भाडे १०-१२ हजार रुपयांपर्यंत गेले आहे. ज्यांना खोल्या मिळाल्या नाहीत, त्यांना उघड्यावर रात्र घालवणे भाग पडत आहे. प्रशासनाने केलेली व्यवस्था तोकडी पडली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेडही बनवले नाहीत. मोबाइल नेटवर्क व्यवस्थित कार्यरत नाही. ही गैरसोय पाहता प्रशासनाने अखेर भाविकांना गौरीकुंडमध्ये त्यांना रोखण्याचा निर्णय घेतला. गढवाल विभागाचे आयुक्त सुशीलकुमार शर्मा यांनी सांगितले की, केदारनाथ धाममध्ये नियोजनाशिवाय येणाऱ्या लोकांना अडचण येत आहे.गर्दी खूप जास्त आहे. त्यामुळे जोवर येथील जत्थे परत जात नाहीत, तोवर पुढील जत्थे गौरीकुंडमध्ये रोखले जातील. दुसरीकडे, मोठ्या गर्दीमुळे वाहनांनाही सोनप्रयागहून पुढे जाऊ दिले जाणार नाही.
शैव लिंगायत विधीने होणार पूजा
बाबा केदारनाथचे मंदिर भारतीयांसाठी केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर उत्तर आणि दक्षिण भारताच्या धार्मिक संस्कृतीच्या संगमाचे स्थळही आहे. उत्तर भारतात पूजा पद्धती भिन्न आहे. मात्र, बाबा केदारनाथमध्ये पूजा दक्षिणच्या वीर शैव लिaंगायत विधीने होते. मंदिराच्या गादीवर रावल(पुजारी) असतात. त्यांना प्रमुखही संबोधतात. हे कर्नाटकशी संबंधित असतात.
६ महिन्यांनंतर समाधीतून बाबा येतील
केदारनाथ विश्व कल्याणासाठी ६ महिने समाधीत असतात,असे मानले जाते. दार बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी चढाव्यानंतर सव्वा क्विंटल भस्म अर्पण केले जाते. दार उघडल्यानंतर बाबा समाधीतून जागे होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.