आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Capitals Of 14 States, 20 Major Financial Centers Still In The Red Zone; Today We Will Come To Know Which Shops Are Going To Open

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:14 राज्यांच्या राजधान्या, 20 मोठी आर्थिक केंद्रे अजूनही रेड झोनमध्ये; किराणाशिवाय इतर कोणती दुकाने उघडी राहणार हे आज कळणार 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या झोपडपट्टीतील मुलांसह सर्व लोक अन्नवाटपास येणाऱ्याची वाट पाहताहेत. - Divya Marathi
मुंबईच्या झोपडपट्टीतील मुलांसह सर्व लोक अन्नवाटपास येणाऱ्याची वाट पाहताहेत.
  • ग्रीन झोनच्या 354 जिल्ह्यांत उद्यापासून लॉकडाऊनमध्ये मुभा
  • आर्थिक राजधानी मुंबई देशातील सर्वाधिक बाधित शहर बनले

कोरोनाचा संसर्ग नसणाऱ्या देशातील ३५९ जिल्ह्यांत सोमवारपासून लॉकडाऊन २.० मध्ये सूट देणे सुरू होईल. शहरांबाहेरील कारखान्यांत काम सुरू होईल. या भागातील लोक ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे वस्तूंची खरेदी करू शकतील. प्लंबर, इलेक्ट्रिशियनसारख्या सेवा आणि उत्पादन सुरू करण्यासही सूट राहील. मात्र, या कामासाठी लागणाऱ्या हार्डवेअरची दुकाने सुरू होण्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. संसर्गमुक्त भागात कोणकोणती दुकाने उघडी राहणार याबाबत सरकार रविवारी स्पष्टीकरण जारी करण्याची शक्यता आहे. सध्या देशातील १७० जिल्हे रेड, २०७ ऑरेंज तर ३५४ ग्रीन झोनमध्ये आहेत. 

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने अडचणी कमी करणे, लॉकडाऊनमध्ये अंशत: सूटच्या तयारीचा आढावा घेतला. पीएमओनेही सात प्रमुख मंत्रालयांशी या मुद्द्यावर चर्चा केली होती. काही क्षेत्रांतील आर्थिक कारभार सुरू करणे हा लॉकडाऊनमध्ये सूट देण्याचा उद्देश आहे. मंत्रिगटाने कामगारांच्या ने-आणबाबतही चर्चा केली. महामारी नियंत्रणासाठी निवृत्त डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, मेडिकलच्या अखेरच्या वर्षाचे विद्यार्थी यांची सेवा घेण्याच्या सूचनेवरही विचार झाला. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणानेही २० एप्रिलपासून महामार्गावर टोल वसूल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ग्रीन झोन शहरे हॉटस्पॉटच्या तुलनेत गरीब 

  • शहरी भाग विषाणूने अधिक बाधित आहेत. मुंबई, दिल्लीसह २० आर्थिक केंद्रे रेड झोनमध्ये आहेत. अशा स्थितीत तेथे लॉकडाऊनमध्ये आर्थिक हालचाली सुरू होऊ शकणार नाहीत.
  • एका विश्लेषणानुसार, रेड झोनमधील २० जिल्हे मोठ्या प्रमाणात आर्थिक केंद्रे आहेत. देशात कोरोनाचे ५०% हून जास्त रुग्ण आणि ६७% बळी याच जिल्ह्यांतील आहेत.
  • यात मुंबईशिवाय इंदूर, अहमदाबाद, वडोदरा, चेन्नई, पुणे, जयपूर, कोइम्बतूर, हैदराबाद, आग्रा, कोलकाता प्रमुख आहेत.
  • ग्रीन झोनमधील ज्या जिल्ह्यांत आर्थिक हालचाली सुरू होणार आहेत, ते रेड झोनच्या तुलनेत खूपच गरीब आहेत.

सुखद बातमी : ४७ जिल्ह्यांत २८ दिवसांपासून कोरोनाचा नवा रुग्ण नाही 

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये ४७ जिल्ह्यांत सकारात्मक चित्र दिसले. येथे २८ दिवसांपासून नवा रुग्ण आढळलेला नाही. यात बिहारचे लखीसराय, गोपाळगंज, भागलपूर, राजस्थानच्या धोलपूर, उदयपूर, पुद्दुचेरीचे माहे, जम्मू-काश्मीरचे पुलवामा आदींचा समावेश आहे. देशात आतापर्यंत आढळलेले ४२९१ जण मरकज जमातशी संबंधित आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांच्या मते, २३ राज्ये, केंद्रशासित  प्रदेशांत जमातशी संबंधित रुग्ण आहेत. तामिळनाडूत ८४%, दिल्ली ६३%, तेलंगण ७९%, यूपी ५९%, आंध्र प्रदेशात ६१%, आसाम ९१% आणि अंदमान-निकोबारमध्ये ८३% रुग्ण जमातशी संबंधित आहेत. 

बातम्या आणखी आहेत...