आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानातील पालीच्या बर-बनाड हायवेवर एका भरधाव SUV ने दुचाकीस्वाराला उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, शेतकरी दुचाकीसह घसरत 50 फूट दूर जाऊन पडला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. त्याचे CCTV फुटेज सोमवारी उजेडात आले.
पालीच्या बर येथील भेराराम बागडी (46) रविवारी सायंकाळी दुचाकीने आपल्या घरी जात होते. त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. घरी पार्टीसाठी जवळपास 200 पाहुणे जमले होते. भेराराम काही सामान आणण्यासाठी बाजारला गेले होते. तेथून ते घरी परत येत होते. तेव्हा बर-बनाड हायवेवर SUV ने त्यांना धडक दिली.
SUV डिव्हायडरवर चढली
हा अपघात एवढा भीषण होता की, शेतकरी दुचाकीसह 50 फूट घसरत गेला. तर त्याची दुचाकी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रॉलीखाली गेली. यावेळी धडक देणाऱ्या एसयूव्हीच्या ड्रायव्हरचेही गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट डिव्हायडरवर चढली. त्यानंतर तो गाडी घटनास्थळी सोडून पळून गेला. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला आहे.
मुलाचा वाढदिवस होता
मृताचे मित्र कानसिंह इंदा यांनी सांगितले की, रविवारी भेरारामचा मुलगा दीपकचा 21 वा वाढदिवस होता. घरी 200 पाहुणे जमले होते. हलवाईने काही सामान मागवले होते. ते आणण्यासाठी भेराराम दुचाकीवरुन बाजारला गेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.