आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछाेट्या शहरांतील रस्ते लवकरच हायएंड कारच्या वाढत्या संख्येचे साक्षीदार ठरतील. मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, लेंबाॅर्गिनीसारख्या सर्व लक्झरी ब्रँड्सना आता छाेट्या शहरांत वेगाने माेठ्या कार खरेदीची क्षमता निर्माण हाेत असल्याचे वाटते. लक्झरी कार बाजारपेठेत नव्या प्रगतीचा मार्ग आता छाेट्या शहरांतून जाणार आहे. छाेट्या शहरांतील श्रीमंत लाेकांची जीवनशैली शहरांतील श्रीमंतांएवढी सुविधाजनक झाली आहे, असे कंपन्यांना वाटते आहे. लक्झरी कारच्या ऑर्डर केवळ माेठ्या शहरांतूनच नव्हे तर छाेट्या शहरांतूनही येत असल्याने कंपन्यांनी हा अंदाज बांधला आहे. त्यामुळेच हायएंड कारची प्रतीक्षा आता सहा ते अठरा महिन्यांपर्यंत गेली आहे.मर्सिडीज बेंझचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ संताेष अय्यर म्हणाले, सध्या आमची ४५ टक्के विक्री केवळ मुंबई व दिल्लीपुरती मर्यादित आहे. परंतु नाशिक, भुवनेश्वर, इंदूरसारख्या शहरांतूनही मागणी वाढली. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह म्हणाले, टियर-२, टियर-३ शहरांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी ३१ हजार ९९० कारची विक्री
२०२२ मध्ये लक्झरी कार सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री मर्सिडीज बेंझने केली. एकूण १५, ८२२ कारची विक्री झाली. ११,९८१ कारसह दुसऱ्या स्थानी बीएमडब्ल्यू राहिली. ऑडीच्या एकूण ४,१८७ कारची विक्री झाली. तिन्ही कंपन्यांची कार विक्री २०२१ च्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.