आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Car Sales Up 70%; GST Collections Hit 1.52 Lakh Crore For Second Time, Manufacturing Jobs At 33 month High

समृद्धीची हॅट‌्ट्रिक:कार विक्री 70% वाढली; जीएसटी संकलन दुसऱ्यांदा 1.52 लाख कोटी, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नव्या नोकऱ्या विक्रमी पातळीवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबरचा सणासुदीचा काळ आर्थिक आरोग्यासाठी ३ शुभ संकेत घेऊन आला. पहिला- ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन १६.६% ने वाढून १.५२ लाख कोटी झाले. हा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी एप्रिल-२२ मध्ये १.६८ लाख कोटींचे संकलन झाले. दुसरा- वाहनांच्या किरकोळ विक्रीत गेल्या वर्षीच्या नवरात्रोत्सवाच्या तुलनेत ५७% वाढ झाली. यात कारची विक्री सर्वाधिक ७०% वाढली. तिसरा- मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात नोकऱ्यांचा वेग ३३ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. आशिया केवळ भारतात उत्पादन वाढले.

ऑटो; दुचाकींपेक्षा कारमध्ये तेजी

कंपनी वाढ ऑक्टो.२२ ऑक्टो. २१ मारुती 21% 1,67,520 1,38,335 ह्युंदाई 33% 58,006 43,556 टाटा 15.5% 78,335 67,829 महिंद्रा 60% 2,298 20,130 किया 43% 23,323 16,331 निसान 45% 10,011 6,917 टाेयाेटा 6% 13,143 12,440 हाेंडा 18% 9,543 8,108 स्काेडा 11% 3,389 3,065 (२०२१ व २२ चे आकडे वाहन विक्रीचे आहेत)

दुचाकींत ५२%, तीनचाकींत ११५%, व्यावसायिक ४८% व कार विक्रीत ७०% वाढ झाली. फाडाने प्रथमच नवरात्रातील आकडे जारी केले होते.

कर; लागोपाठ ८व्या महिन्यात वाढ {जीएसटी संकलनाचा ताजा आकडा (१.५२ लाख कोटी रु.) ऑक्टोबर २०२१ च्या १.३० लाख कोटींच्या तुलनेत सुमारे १७% पर्यंत अधिक आहे. {लागोपाठ आठव्या महिन्यात जीएसटी संकलन १.४० लाख कोटींपेक्षा जास्त झाले. एकूणच नवव्यांदा हा आकडा पार केला आहे. {केंद्रीय जीएसटी २६,०३९ कोटी, राज्य जीएसटी ३३,३९६ कोटी व एकत्रित जीएसटीची भागीदारी ८१,७७८ कोटी आहे. उपकराच्या माध्यमातून १०,५०५ कोटी जमा झाले. {इक्राच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर सांगतात, या प्रचंड वाढीमध्ये गेल्या महिन्यातील व्यवहाराचे खूप मोठे योगदान आहे.

उत्पादन; इंडेक्स गेला ५५ च्याही वर {एसअँडपी ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) सप्टेंबरमधील ५५.१ वरून ऑक्टोबरमध्ये ५५.३ वर गेला. {रॉयटर्सने इंडेक्स ५४.९ या पातळीवर राहण्याचा अंदाज वर्तवला होता. नव्या आकड्यांसह लागोपाठ १६व्या महिन्यात स्थितीत सुधारणा पाहायला मिळाली. {पीएमआयमध्ये ५० च्या वर असणे उपक्रमांमध्ये विस्ताराचा संकेत आहे. ५० पेक्षा कमी म्हणजे घसरण. {सर्व्हेनुसार, मागणी कायम राहण्याच्या अपेक्षेने कंपन्या भरती सुरू ठेवतील.

ऑक्टोबर : पेट्रोल विक्री १२.१% ने वाढून २.७८ व डिझेल १२% ने वाढून ६.५७ दशलक्ष टन झाली. ती ४ महिन्यांत सर्वाधिक.

...मात्र गावांमध्ये बेरोजगारी वाढली सीएमआयच्या मते, देशात बेरोजगारी दर ऑक्टोबरमध्ये वाढून ७.७७% वर पोहोचला. तो सप्टेंबरमध्ये ६.४३% आणि ऑगस्टमध्ये ८.२८% होता. गावांमध्ये बेरोजगारी दर सुमारे ३% ने वाढून ८.०४% वर पोहोचला आहे.

हरियाणात सर्वाधिक बेरोजगारी हरियाणा31.8% राजस्थान30.7% जम्मू-काश्मीर22.4% झारखंड16.5% बिहार14.5%

मप्र : बेरोजगारी सर्वात कमी मध्य प्रदेश0.8% छत्तीसगड0.9% ओडिशा1.1% गुजरात1.7% कर्नाटक2.7%

बातम्या आणखी आहेत...