आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूचा LIVE VIDEO:दारूच्या नशेत कारचा स्टंट, 3 जणांना चिरडले; एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका कारने तिघांना चिरडल्याची घटना घडली. यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

रविवारी रात्री 2 वाजता ही घटना घडली. गुरुग्रामच्या हाय-प्रोफाइल क्षेत्र उद्योग विहारमधील वाईन शॉपसमोर दोन अर्टिगा वाहनांमध्ये आठ लोक आले. सर्वजण दारू पीत होते. आरोपीने आधी तिथे उभ्या असलेल्या काही लोकांशी हुज्जत घातली आणि नंतर रस्त्यावर स्टंटबाजी करत तिघांना चिरडले.

गुरुग्रामच्या उद्योग विहारमध्ये कारने उभ्या लोकांना चिरडले.
गुरुग्रामच्या उद्योग विहारमध्ये कारने उभ्या लोकांना चिरडले.

कचरा वेचणाऱ्याचा मृत्यू
यात एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दोन अर्टिगा वाहने जप्त केली आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी 7 आरोपींसोबत पत्रकार परिषद घेतली.
पोलिसांनी 7 आरोपींसोबत पत्रकार परिषद घेतली.

घटनेनंतर आरोपी फरार
घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी गुरुग्रामच्या रस्त्यावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता आरोपींचा सुगावा लागला. सर्वप्रथम, गुरुग्रामच्या दुंदहेरा गावातील रहिवासी सौरभ शर्माला अटक करण्यात आली आहे. सौरभ शर्मा अर्टिगा कार चालवत होता. सौरभ, राहुल, रवी, विकास, मुकुल सोनी, मोहित, लव भारद्वाज यांची चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. आठवा आरोपी रुग्णालयात दाखल आहे. हाणामारीत त्याला गंभीर दुखापत झाली.

बातम्या आणखी आहेत...