आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Career Funda Biggest Investing Secrets Warren Buffett | The Intelligent Investor | Career Funda

करिअर फंडा:शेअर मार्केटमधील यशाच्या ऐतिहासिक पुस्तकाचा आढावा, 'द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर'द्वारे जाणून घ्या गुंतवणुकीचे रहस्य

संदीप मानुधने, शिक्षणतज्ज्ञ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"मी तुम्हाला श्रीमंत होण्याचा मार्ग सांगेल. दरवाजे बंद करा. जेव्हा इतर लोभी व्यक्ती असतील तेव्हा घाबरा. जेव्हा इतर घाबरतील तेव्हा लोभी व्हा." - वॉरेन बफे

करिअर फंडात स्वागत!

सर्वात सुप्रसिद्ध गुंतवणूकदाराला कुणी मोटीव्हेट केले.

प्रदिर्घ काळापर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत राहणाऱ्या अमेरिकन बिझनेस इन्व्हेस्टर व फिलॉन्थ्रोपिस्ट वॉरन बफे यांचा हा गुंतवणुकीचा मंत्री आहे.

तुम्हाला माहिती आहे का की, वॉरेन बफे यांना गुंतवणुकीसाठी कोणत्या पुस्तकातून सर्वाधिक प्रेरणा मिळाली होती. हो, बेंजामिन ग्रॅहम लिखित 'द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर' या पुस्तकाने त्यांना प्रेरित केले. या पुस्तकाच्या लेखकाला वॉरेन बफे आपल्या आयुष्यात वडिलानंतर दुसऱ्या प्रभावशाली व्यक्तीचा दर्जा देतात.

श्रीमंत व्हा, सुरक्षित व्हा

तुमचीही श्रीमंत होण्याची इच्छा आहे का? नसेल तरीही महागाईपासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी तुमची बचत योग्य ठिकाणी गुंतवण्याची गरज आहे. अन्यथा महागाईचा दर एकावेळी तुमची बचत शून्य करेल. चला तर मग जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या वॉरेन बफे यांना प्रेरित करणाऱ्या बेस्ट सेलिंग पुस्तक 'द इंटेलिजेंट इन्वेस्टर'मध्ये काय नमूद आहे हे जाणून घेऊया...

संपूर्ण पुस्तक इंटरनेटवर हिंदी व इंग्रजी भाषेत मोफत उपलब्ध आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, या पुस्तकाचे चॅप्टर 2 व 8 सर्वात महत्त्वपूर्ण आहे. आज या पुस्तकातील गुंतवणुकीचे 5 सर्वात मोठे रहस्य जाणून घेऊया-

क्रांतीकारी पुस्तकातील 5 मोठे सीक्रेट

1) इंटेलिजेंट इन्वेस्टर कोण? (Who is an “intelligent investor”)

इंटेलिजेंट इन्वेस्टरमध्ये कोणते गुण असावेत? पुस्तकात ग्रॅहम याचे उत्तर देतात की, इन्व्हेस्टर शांत, धैर्यवान व डिसिप्लिन्ड असला पाहिजे. तो शिकण्यासाठी उत्सुक असला पाहिजे. गुंतवणुकीच्या जगात गुंतवणूकदार स्वतःच आपला सर्वात मोठा शत्रू असतो. आपला लोभ व इमोशन्सवर नियंत्रण नसल्यामुळे तो स्वतःच स्टॉक्स अँड शेयर्स चुकीच्या वेळी खरेगी करतो व विकतो.

ग्रॅहम सांगतात की, मार्केटमध्ये रिस्क नेहमीच राहील. ती केव्हाही दूर करता येत नाही. गरज आहे भरून काढता न येणारे नुकसान कमी कसे करावे. प्रदिर्घ काळ फायदा कसा घ्यावा. यासाठी स्वतःला पराभूत करणाऱ्या स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

2) स्पेक्युलेटर (सट्टेबाज) नव्हे इन्वेस्टर (गुंतवणूकदार) बना (Be an investor not a speculator)

पुढे समाजवून सांगताना ग्रॅहम लिहितात की, इन्व्हेस्टर व स्पेक्युलेटर दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतात.

जिथे गुंतवणूकदार स्वतः रिसर्च करून प्रदिर्घ काळासाठी गुंतवणूक करतात. तिथे स्पेक्युलेटर टीव्ही कार्यक्रम, हिंट्स, ट्रिक्स आदींवर विश्वास करून डेली बेसिसवर लाभ कमावण्याचा प्रयत्न करतात. इन्व्हेस्टर 'सेफ्टी ऑफ कॅपिटल'वर लक्ष्य देतात. तर स्पेक्युलेटर 'प्रॉफिट'वर. पुढे ते पॅसिव्ह व अॅक्टिव्ह इन्व्हेस्टरवरही भाष्य करतात.

3) झुंडीची मानसिकता टाळा (Avoid herd mentality)

मि. मार्केटच्या काल्पनिक पात्राद्वारे ग्रॅहम इंटेलिजेंट गुंतवणूकदारांना झुंडीच्या मानसिकतेपासून (मेंढरांसारखे वर्तन) स्वतःला दूर ठेवण्याचा सल्ला देतात. मनुष्यही एक प्रजाती म्हणून मेंढरांसारखा समूह वर्तन करतो.

तुम्ही स्वतःवर एक प्रयोग करून पाहू शकता. जेव्हा तुम्ही आपल्या 3-4 मित्रांसोबत बाहेर कुठेतरी जात असता, तेव्हा चालताना अचानक वाकण्यापासून वाचण्याचे नाटक करा. (उदा. एखाद्या फेकलेल्या किंवा पडणाऱ्या वस्तुपासून वाचण्याचा प्रयत्न). तुमच्यासोबत चालणारे तुमचे मित्रही भीतीने तुमच्यासारखेच वर्तन करतील. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना आपण असे का करत आहोत हे माहिती नसते.

हा मनुष्याचा प्रजातीगत स्वाभाविक व्यवहार आहे. शेयर मार्केटमध्येही हेच दिसून येते. -जेव्हा मार्केटमध्ये विक्री सुरू होते तेव्हा प्रत्येकजण कोणताही विचार न करता आपले शेयर्स विकतो. यामुळे मार्केट बियरीश अर्थात मंद होते. याच धर्तीवर जेव्हा मोठे गुंतवणूकदार खरेदी सुरू करतात, तेव्हा लोकही विनाविचार खरेदी सुरू करतात व मार्केट बुलिश अर्थात वेगवान होते.

इंटेलिजेंट इन्व्हेस्टर या जाळ्यात अडकू नये अशी ग्रॅहम यांची इच्छा आहे. प्रत्यक्षात ते याच्या बरोबर उलट करण्याचा सल्ला देतात. अर्थात जेव्हा मार्केट कोसळते तेव्हा शेयर्सची खरेदी करा व चढल्यानंतर शेयर्सची विक्री करा.

4) प्रॉमिस ऑफ एडिक्वेट रिटर्न (समाधानकारक लाभ) व मार्जिन ऑफ सेप्टी

हे समजावून सांगताना ग्रॅहम सांगतात की, प्रत्येक व्यक्तीचा समाधानकारक लाभ वेगवेगळा असतो. त्यामुळे त्यानुसारच गुंतवणूक कुठे करावी हे ठरले पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे समाधानकारक लाभ गुंतवण्यात आलेल्या पैशांचे वार्षिक 7-8 टक्के असेल, तर त्या व्यक्तीसाठी बँकतेली फिक्स्ड डिपॉझिट योग्य आहे. पण एखाद्या व्यक्तीचे हे टार्गेट 10-11% असेल, तर त्याच्यासाठी सोन्याची गुंतवणूक योग्य ठरेल. 15-16 टक्के रिटर्न हवे असणाऱ्यासाठी म्यूचुअल फंड योग्य ठरण्याची शक्यता आहे.

ग्रॅहम मार्जिन ऑफ सेफ्टी कायम राखण्याचाही सल्ला देतात. समजा, एखादा स्टॉक तुम्ही 100 रुपयांत खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्जिन ऑफ सेफ्टी राखत तुम्ही तो 80 रुपयांनी खरेदी करा. असे केल्यास अनपेक्षित स्थितीत तुमचा फंड सुरक्षित राहील.

5) आपल्या सर्वच आशा एकावरच लावू नका (Don’t put your eggs in one basket)

ग्रॅहम आपले फंड्स डायव्हर्सिफाय करण्याचा सल्ला देतात. त्यानुसार कोणत्याही एकाच सेक्टर किंवा कंपनीचे शेयर्स खरेदी करू नका.

भविष्यात काय होईल, कोणती कंपनी किंवा सेक्टर वर जाईल हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेयर्स खरेदी करा. त्यातील काही तुम्हाला चांगला लाभ मिळवून देतील, काही थोडा व काही कमी रिटर्न देतील. पण सरासरी काढल्यास तुम्हाला चांगले रिटर्न मिळेल.

आशा आहे, पुस्तकाचे मी केलेले विश्लेषण तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

तर आजचा करिअर फंडा हा आहे की, गुंतवणुकीचे सोनेरी नियम जाणून घेऊन आपल्या कष्टाने कमावलेले पैसे संयमाने दुप्पट-चौपट बनवा व जीवनात यश संपदान करा.

करून दाखवूया!

बातम्या आणखी आहेत...