आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Career Funda । General Knowledge Study In Competitive Exams । 7 Big Mistakes Students Should Avoid To Score More Marks

करिअर फंडा:जनरल नॉलेजच्या तयारीत विद्यार्थ्यांनी टाळाव्यात 7 मोठ्या चुका, असे मिळवा जास्त गुण

शिक्षणतज्ज्ञ संदीप मानुधनेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जे ‘मला माहिती आहे’ ते मी जे ‘माहिती नाही’च्या आधारे सांभाळतो.
~ अंटोनियो पोर्शिया (अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध कवि)

करिअर फंडामध्ये स्वागत!

जनरल नॉलेज म्हणजेच GK सर्व मोठ्या परीक्षांतील महत्त्वाचा भाग आहे. यामुळे जाणून घेऊया की, अशा नेमक्या कोणत्या चुका आहेत, ज्या टाळून याची तयारी केली पाहिजे.

GKमध्ये या 7 मोठ्या चुका टाळा

1) घोकमपट्टी कशाला! – फॅक्ट्स अँड फिगर्स यांची घोकमपट्टी करणे चुकीची सवय आहे. फॅक्ट्स अँड फिगर्स पाठ करण्याऐवजी त्या नीट समजून लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ– माझ्या एका विद्यार्थ्याला प्लासीच्या लढाईचे वर्ष 1757 कधीही लक्षात राहत नव्हते, पण जेव्हा एकदा त्याने टीव्ही मालका 'रक्तरंजित'मध्ये प्लासीच्या लढाईची पूर्ण कहाणी पाहिली तेव्हा त्याची तारीखही (23 जून 1757) त्याच्या कायमची लक्षात राहिली. म्हणजेच, जिज्ञासु (क्यूरियस) बना, घोकमपट्टी करणारा पोपट नव्हे. हिन्दी आणि मैथिलीतील प्रसिद्ध कवी आणि कथाकार राजकमल चौधरी सांगतात, 'जानने की कोशिश मत करो। कोशिश करोगे तो पागल हो जाओगे।' शिकवण– जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका, तर खरोखर समजून घ्या.

2) बुल्स आय– टू-द-पॉइंट तयारी न करणे चुकीचे आहे. आपली तयारी नेहमी परीक्षेनुसार टू-द-पॉइंट करा. यासाठी आधी परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे विषय आणि पॅटर्न नीट समजून घ्या. यासाठी आधीच्या वर्षांचे पेपर्स आणि अॅनालिसिस केले जाऊ शकते. त्यानंतर त्या सर्व विषयांचे टिपण काढा जे महत्त्वाचे आहेत. शिकवण– परीक्षेत फक्त तेवढेच करा, जेवढे गरजेचे आहे.

3) स्वत: नोट्स न काढणे – अनेक विद्यार्थी अतिशय सुबक छापलेल्या नोट्स किंवा पीडीएफच्या आधारेच अभ्यास करत राहतात आणि त्यांना वाटते की, आपला मेंदू सर्वकाही लक्षात ठेवील. पण आपल्या हातांनी, स्वत: मेहनत करून काढलेल्या नोट्सची कशाचीही बरोबरी नाही. जर तुम्ही योग्यरीत्या नोट्स काढल्या असत्या, तर त्यामुळे तयार झालेला आत्मविश्वास तुम्हाला अभ्यास उत्तमरीतीने लक्षात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. शिकवण – नेहमी जी.के.च्या स्वत:च्या हातांनी लिहिलेल्या नोट्स जरूर काढा.

4) उद्याचे काम आजच करा – जीके अखेरच्या क्षणासाठी सोडू नका. परीक्षा कोणतीही असो जनरल नॉलेजच्या तयारीसाठी वेळ लागतो, म्हणून जर अखेरसाठी सोडाल तर घबराट होऊ लागेल. अखेरच्या क्षणी वाढलेले बर्डन तुमचा स्ट्रेस वाढवते आणि तयारीचा शेड्यूल बिघडवते. जनरल नॉलेजच्या अभ्यासाला सीमा नाही, असा विचार करून ती सोडून इतर विषयांचा अभ्यास करत राहिल्याने ताण वाढतो. अनेक शिक्षक असे म्हणतानाही ऐकू येतात की, जनरल नॉलेजचे क्षेत्र खूप मोठे आहे, त्यामुळे त्याच्या तयारीसाठी जेवढी मेहनत घेतली जाईल, तेवढ्यात इतर विषयांची चांगली तयारी होते. पण हे खरे नाही. प्रत्येक परीक्षेच्या सामान्य ज्ञान विभागाची स्वतःची खुबी असते. त्यानुसार तयारी केली, तर कमी प्रयत्नातही पुरेसे परिणाम मिळू शकतात. शिकवण - तयारीचे लहान लहान टप्पे करा.

5) खींचो न कमानों को न तलवार निकालो, जब तोप मुक़ाबिल (प्रतिस्पर्धी) हो तो अख़बार निकालो ~ अकबर इलाहाबादी – दररोज योग्य वृत्तपत्र न वाचणे, जनरल नॉलेजच्या तयारीत सर्वात मोठी चूक आहे. रोज वृत्तपत्र वाचल्याने तुम्हाला करंट अफेयर्स माहिती असतात, जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. वृत्तपत्र वाचून त्यातून महत्त्वाचे पॉइंट्स नोट करा. नंतर परीक्षेच्या या नोट्स रिव्हाइज करा. आणि एक वा दोन पेपर फिक्स करून ठेवा, दररोज पेपर बदलायचा नाही. शिकवण – तयारीतला साथी, वृत्तपत्र ज्ञानसारथी.

6) प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे – मॉक टेस्ट न देणे- अर्थात अभ्यास केल्याने जडमतिही बुद्धिमान होऊ शकतो. मॉक टेस्ट जरूर द्या. यामुळे तुम्हाला फायनल लेव्हलवर तयारी करण्यात मदत मिळते. सर्वात रिअलिस्टिक मॉक टेस्ट सिरीज जॉइन करा. शिकवण – परीक्षेच्या आधी, अनेक परीक्षा द्याव्या लागतात.

7) जी.के. एकट्याने वाचणे – या विषयाचे नेचर असे आहे की एकेकट्याने वाचत राहिल्याने यात मजा येते, ना अभ्यास नीट लक्षात राहतो. एक ग्रुप बनवा मित्रांचा, ऑफलाइन या ऑनलाइन, आणि त्यात सतत डिसकशन्स करत राहा. अनेक मेंदू, एका मेंदूपेक्षा उत्तमच असतात! शिकवण – जी.के.मध्ये ग्रुप स्टडीचा फायदा होतो.

आजचा करिअर फंडा हा आहे की, जीकेमध्ये वेळेची गुंतवणूक करून या स्थूल चुका सुधारून घ्या.

करून दाखवू.

बातम्या आणखी आहेत...