आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Career Funda । How To Solve Maths In Competitive Exam, Read Useful Practical Tips

करिअर फंडा:स्पर्धा परीक्षेत कसे सोडवावे गणित, वाचा फायदेशीर प्रॅक्टिकल टिप्स

​​​​​​​शिक्षणतज्ज्ञ संदीप मानुधनेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणित अतिशय खतरनाक विषय आहे, आणि गणिताचे शिक्षक तर त्याहून खतरनाक!

एकदा एका इतिहास आणि गणिताच्या शिक्षकात भांडण झाले. इतिहासाच्या शिक्षकाने गणिताच्या शिक्षकाला धमकी दिली की, जर तुम्ही माझे ऐकले नाहीत, तर मी अकबराच्या संपूर्ण सैन्यासह तुमच्यावर हल्ला करीन. गणिताचे शिक्षक म्हणाले काही हरकत नाही, मी त्या सैन्याला कंसात टाकेन आणि शून्याने गुणाकार करेन.

करिअर फंडामध्ये तुमचे स्वागत!

स्पर्धा परीक्षेतील गणितावरून विद्यार्थ्यांच्या मनात निरनिराळ्या शंका घर करून असतात. आज आपण अॅप्टिट्यूड मॅथ्सवर (आय.आय.टी.वाले नाही) बोलूया.

जलदगतीने गणिताचे प्रश्न सोडवण्याच्या 6 स्ट्रॉग टिप्स

1) पॉवर ऑफ वन - एकच प्रश्न-प्रकार सोडवण्यासाठी अनेक तंत्रे शिकू नका, तर एक पद्धत शिका आणि त्यात प्रभुत्व मिळवा. गणिताचे शॉर्ट-कट शिकत असताना, अनेक विद्यार्थ्यांना वाटते की त्यांनी एकापेक्षा जास्त पद्धती शिकल्या तर त्यांचा फायदा होईल. पण हा एक भ्रम आहे. एकाच प्रश्न-प्रकारासाठी एकापेक्षा जास्त पद्धती शिकल्याने उलट गोंधळ वाढतो. उदाहरणार्थ, समजा की तुम्हाला संख्यांचा गुणाकार करण्याच्या तीन वेगवेगळ्या पद्धती माहिती आहेत, आणि त्यापैकी कोणत्याही पद्धतीचा खूप सराव नाही, तर परीक्षेच्या तणावपूर्ण वातावरणात, तुम्ही त्याबद्दल विचार करून तुमचा वेळ वाया घालवत असाल. कोणती पद्धत वापरायची त्याऐवजी एखादी पद्धत शिकून त्यावर प्रभुत्व मिळवा जेणेकरून ती तुमच्या "सब-कॉन्शस"चा भाग होईल. शिकवण - जास्त टेक्निक्स नेहमीच चांगली टेक्निक नसते.

2) पाढे, वर्ग, घन आणि टक्केवारी, अपूर्णांकाचे तक्ते लक्षात ठेवा- स्पर्धा परीक्षांच्या गणित सेक्शनमध्ये टेबल्स (पाढे), स्क्वेअर्स (वर्ग), क्यूब्स (घन) लक्षात न ठेवल्याने तुमचे गंभीर नुकसान होऊ शकते. ते लक्षात न ठेवता गणित करणे म्हणजे कोणीतरी तुमचे हातपाय बांधून त्यांना चालायला सांगणे असे आहे. आजकाल काही परीक्षांमध्ये कॅल्क्युलेटर दिले जातात, परंतु व्यवहारात ते वेळेची बचत करण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. समजा तुम्हाला चार-अंकी संख्या दुसर्‍या चार-अंकी संख्येमध्ये जोडायची असेल, तर तुम्हाला कॅल्क्युलेटरवर सुमारे 10 बटणे दाबावी लागतील (किंवा क्लिक करावी लागतील), परंतु मानसिक गणना त्यापेक्षा वेगवान असू शकते (आणि त्रुटीची शक्यता तर बटण दाबतानाही असतेच.) या मोफत साइटवर तुम्हाला गणिताचे हजारो सोडवलेले प्रश्न सापडतील- https://bit.ly/aptitudefree

3) संकल्पना समजून घ्या, सूत्रे घोकत बसू नका – प्रत्येक परिस्थितीसाठी एक सूत्र लक्षात ठेवणे ही विद्यार्थ्यांची मोठी चूक आहे. सूत्रांची अडचण अशी आहे की, त्यांचा स्पॅन खूप लहान असतो, याचा अर्थ असा आहे की जर प्रश्न थोडासा बदलला असेल, तर सूत्र यापुढे उपयुक्त नाही. त्याऐवजी, प्रथम संपूर्ण विषयाची संकल्पना समजून घ्या आणि कोणत्याही विषयासाठी एक किंवा दोन थंब रूल लक्षात ठेवा. पहिल्यांदा नक्कीच जास्त वेळ लागेल पण आत्मविश्वास जबरदस्त असेल. शिकवण- विषय खोलवर समजून घ्या.

4) वर्किंग बॅकवर्डस फ्रॉम ऑप्शन्स – प्रश्न थेट (फॉरवर्ड) सोडवण्याऐवजी, काही प्रश्नांमध्ये पर्याय वापरून उलट सोडवणे चांगले. या प्रश्नाचा विचार करा - प्र. दोन बॉक्स आहेत ज्यात काही पॅकेट आहेत. जर 10 पॅकेट पहिल्यापासून दुसऱ्या बॉक्समध्ये हलवल्या गेल्या तर दोन्ही बॉक्समध्ये समान संख्येची पॅकेट्स असतील. जर 20 पॅकेट दुसऱ्या बॉक्समधून पहिल्या बॉक्समध्ये हलवले तर पहिल्या बॉक्समध्ये दुसऱ्या बॉक्सच्या तुलनेत दुप्पट पॅकेट्स असतील. पहिल्या बॉक्समध्ये किती पॅकेट आहेत? (A) 40 (B) 60 (C) 80 (D) 100 (E) 120. आता हा प्रश्न थेट सोडवण्याऐवजी पर्याय वापरून सोडवता येईल. उत्तर असेल (d) 100. शिकवण - काही प्रश्नांसाठी उलटे चालणे चांगले ठरते.

5) समीकरणाचे योग्य समाधान करा – समीकरण सोडवण्याऐवजी, दिलेल्या पर्यायांमधून समीकरणामध्ये सेट केलेली मूल्ये मिळवणे ही एक उपयुक्त पद्धत आहे. उदाहरणार्थ - X पक्षी झाडाच्या ठराविक फांद्यांवर बसलेले असतात. जर प्रत्येक फांदीवर 16 पक्षी बसवायचे असतील तर 8 बसायचे बाकी राहतात, परंतु जर प्रत्येक फांदीवर 20 पक्षी बसवायचे असतील तर 2 फांद्या रिकाम्या राहतील. एक्स शोधा? (A) 200 (B) 260 (C) 100 (D) 50 (E) 20. तर 16 B + 8 = X आणि 20 (B – 2) = X. वरच्या समीकरणात मूल्ये बदलून उत्तर मिळवणे सोपे होईल. विशेषतः जर द्विघात समीकरणे (क्वाड्राटिक इक्वेशन) असतील तर आणखी चांगले. शिकवण - प्रत्येक वेळी समीकरण पूर्णपणे सोडवणे आवश्यक नाही.

6) रुलिंग आऊट द ऑप्शन्स- पर्याय नाकारणे - योग्य उत्तर शोधण्याऐवजी, चुकीच्या उत्तरांमधून जाणे ही एक प्रभावी पद्धत आहे. प्रश्न वाचताना अनेकवेळा असे लक्षात येते की उत्तर कधीच असू शकत नाही. कोणत्याही चार ऑप्शन पेपरमध्ये, तुम्ही तीन पर्याय काढून टाकल्यास, तुम्हाला निश्चित उत्तर मिळू शकेल. शिकवण - प्रश्न वाचताना कोणता पर्याय उडू शकतो याचा विचार करा.

म्हणूनच आजचा करिअर फंडा आहे की, गणिते समजून घेणे आणि अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये गणित पटकन सोडवणे या दोन भिन्न बाबी आहेत.

करून दाखवू!

बातम्या आणखी आहेत...