आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Career Funda । Inspiring Indus Valley Civilization (IVC), Learn 5 Life Lessons From Your Ancestors

करिअर फंडा:प्रेरणादायी आहे इंडस व्हॅली सिव्हिलायजेशन (IVC), आपल्या पूर्वजांकडून शिका आयुष्याचे 5 धडे

शिक्षणतज्ज्ञ संदीप मानुधनेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दशकों से ढूँढ रहे, तथ्य अब भी अधूरे, तथ्य अब भी प्यासे ।
उदय को समय सीमा में बाँध नहीं पाते, अस्त का कारण हम ढूँढ नहीं पाते ।
रोचक हैं , रोमांचित करती विश्व को, सभ्यता ये सिंधु घाटी की । ~ कुमार अमरदीप

संडे करिअर फंडामध्ये स्वागत!

आपल्या पूर्वजांनी 1000 पेक्षा जास्त शहरे (गावे नाही) असणारी संस्कृती 4000 वर्षांपूर्वी वसवली होती, यावर तुमचा विश्वास बसेल?

सिंधू संस्कृती (इंडस व्हॅली सिव्हिलायजेशन) साउथ एशियाच्या नॉर्थवेस्ट (उत्तर-पश्चिमी) क्षेत्रात कांस्य युगातील (ब्राँझ एज) संस्कृती होती, जी इसवी सन पूर्व 3300 ते इसवी सन पूर्व 1300 वर्षांपर्यंत बहरली होती, आणि याचे सुधारित रूप इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 1900 पर्यंत होते.

या भव्य संस्कृतीच्या उत्खननात आपल्याला नागरी नियोजनाचे पूर्ण पुरावे मिळतात. लक्षात ठेवा की जगातील फक्त चार प्रमुख नदी खोऱ्यातील संस्कृतींमध्ये एवढी शहरे आहेत आणि कितीतरी नियोजित शहरे आहेत! त्यांची सर्वात मोठी शहरे मोहेंजोदारो आणि हडप्पा आहेत, जेथील लोकसंख्या 50,000 पेक्षा जास्त असावी.

सिंधू संस्कृतीचा शोध 1900 च्या सुरुवातीला जॉन मार्शल नावाच्या एका ब्रिटिश पुरातत्त्वज्ञाने केली होती.

आजच्या भारतात आपण IVC पासून नक्कीच खूप काही शिकू शकतो. तुम्ही तयार आहात आपल्या पूर्वजांकडून शिकायला?

1) खूप वेगळी राजकीय यंत्रणा – सिंधू खोऱ्याच्या उत्खननात राजवाड्यासारखी वास्तू किंवा कोणत्याही राजाचे अस्तित्व कुठेही आढळले नाही! त्याऐवजी अशा इमारती आढळल्या आहेत ज्यांचा वापर सर्वांनी एकत्रितपणे केला असावा, जसे की मोठे स्नानगृह आणि धान्यासाठी खोल्या. यावरून त्यावेळचा समाज समतावादी (Igaletarian) असला पाहिजे हे समजू शकते. शिकवण - लोकशाहीच्या हानीच्या आणि जगभरात हुकूमशाही पसरवण्याच्या या युगात हा एक मोठा धडा आहे.

2) टाउन प्लॅनिंग, पक्के घर, वॉटर मॅनेजमेंट, ड्रेनेज –आज भारताची शहरे ज्या समस्यांनी त्रस्त आहेत, IVCमधील आपल्या पूर्वजांनी त्या केव्हाच सोडवल्या होत्या! सुंदर शहरी नियोजन हे सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. त्यात भाजलेल्या विटांची घरे, पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था, पाणीपुरवठा यंत्रणा आणि मोठ्या, अनिवासी इमारतींच्या क्लस्टरसाठी प्रसिद्ध आहे. असे करणाऱ्या जगातील पहिल्या लोकांपैकी ते एक होते. विटांनी बनवलेल्या भूमिगत नाल्यांद्वारे सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात होती. लोकांनी स्वच्छता आणि आरोग्याकडे खूप लक्ष दिले होते. वाहते पाणी घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरांनी एक जटिल कालवा प्रणाली वापरली. शिकवण - विसाव्या शतकातील भारताच्या 'स्वच्छता मिशन'साठी स्वतःच्या इतिहासातून ही एक मोठी प्रेरणा आहे.

3) इनोव्हेटिव्ह, सायंटिफिक, डेव्हलप्ड, पीसफुल सिव्हिलायजेशन – इंडस व्हॅली सिव्हिलायजेशन धातू विज्ञानातही तांत्रिकदृष्ट्या प्रगत होती. महत्त्वाच्या शोधांमध्ये (a) मानकीकृत वजन आणि मापे, (b) मोहोर ठसे, आणि (c) तांबे (कॉपर), कांस्य (ब्राँझ), शिसे आणि टिनसोबत मेटालर्जीचाही समावेश आहे. कापसापासून कापड तयार करणारे ते जगातील पहिले लोक होते. हडप्पाच्या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे सापडली नाहीत. उलटपक्षी, उत्खननात मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या खेळण्यांमुळे याला कधीकधी 'खेळण्यांची संस्कृती' असे संबोधले जाते. उत्खननात लुडो आणि बुद्धिबळ यांसारख्या आधुनिक खेळांमध्ये वापरल्या जाणार्‍या फासे आणि सीलसारखे दगडी शिक्के आणि बोर्ड मिळाले आहेत. त्यांना गणित आणि प्रमाणीकरणाचेही ज्ञान होते. शिकवण - जेव्हा एखाद्या संस्कृतीला मोठ्या प्रमाणावर खेळणी मिळतात, तेव्हा समजून घ्या की, ती एक प्रगत संस्कृती असेल.

4) प्रगत व्यापार प्रणाली (अॅडव्हान्स्ड बिझनेस सिस्टिम) – इंडस व्हॅली सिव्हिलायजेशनचे शहर थेट, आपसात समकोन (राइट अँगल) वर छेदणाऱ्या रस्त्यांनी जोडलेले होते. या व्यग्र रस्त्यांवर बैलगाड्यांनी माल आणला आणि नेला जात होता. व्यापार या संस्कृतीच्या केंद्रस्थानी होता, म्हणूनच सर्व यंत्रणा तशाच विकसित करण्यात आल्या होत्या, जसे की वस्तू मोजण्याची मापे एकसारखी दगडे, जी 5:2:1 च्या गुणोत्तरात 0.05, 0.1, 0.2, 0.5, 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 200, आणि 500 एककात होते. शिकवण - आजचा आधुनिक भारत वर्ल्ड ट्रेडमध्ये योग्य रणनीतीमुळे खूप पुढे जाऊ शकतो.

5) इतिहासातून धडा – इंडस व्हॅली सिव्हिलायजेशन संपुष्टात येण्याच्या कारणांमध्ये क्लाइमेट चेंज, आजारांचा प्रसार, नैसर्गिक कारणांमुळे होणारे स्थलांतर, बाहेरच्या लोकांनी केलेली हिंसा ही प्रमुख मानली जातात. शिकवण - हे सर्व ग्लोबल वॉर्मिंग, कोविड-19, रशिया-युक्रेन संकट, इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष इत्यादींच्या रूपात उपस्थित आहेत आणि सिंधू संस्कृतीच्या अभ्यासाद्वारे या समस्यांचे व्यवस्थापन केले जाऊ शकते.

तर आजचा संडे मोटिव्हेशनल करिअर फंडा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून खूप काही शिकून, आपली मानसिकता निश्चित करून आपण आपला देश आणि करिअर समृद्ध करू शकतो.

करून दाखवू!

बातम्या आणखी आहेत...