आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cars And Houses Will Become More Expensive, Now You Have To Pay Rs 500 For Aadhaar Pan Link; These 12 Changes Were Made From Today

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात:कार आणि घर महागणार, आधार-पॅन लिंक करण्यासाठी आता द्यावे लागणार 500 रुपये; आजपासून करण्यात आले हे 12 बदल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. यासह, सामान्य लोक, बँकिंग आणि ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित अनेक बदल होत आहेत. कार खरेदी करून महामार्गावर प्रवास करणे आजपासून महागणार आहे आहे. याशिवाय, जर तुम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला त्यातून होणाऱ्या नफ्यावर 30% कर भरावा लागेल. आजपासून होणार्‍या अशाच 12 बदलांबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत ज्यांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल.

1. प्रवास महागणार
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आज दुपारी 12 वाजल्यापासून टोल टॅक्समध्ये 10 ते 65 रुपयांची वाढ केली आहे. छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 रुपयांनी तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

2. परवडणारे घर खरेदी करण्यावर अतिरिक्त कर सूट मिळणार नाही
आता तुम्हाला गृहकर्जावरील व्याजावर कर सवलतीचा लाभ मिळणार नाही. आयकर कायद्याच्या कलम 80EEA अंतर्गत 1.5 लाखांच्या अतिरिक्त कपातीचा लाभ यापुढे उपलब्ध होणार नाही. आयकर कायद्याच्या कलम 80EEA अंतर्गत, जर घराची किंमत 45 लाखांपेक्षा कमी असेल, तर व्याज पेमेंटवर 1.5 लाखांपर्यंत वजावट म्हणून दावा केला जाऊ शकतो. ही वजावट किंवा सूट कलम 24बी अंतर्गत उपलब्ध असलेल्या 2 लाख रुपयांच्या सूटव्यतिरिक्त होती.

3. पीएफच्या व्याजावर कर भरावा लागेल
ज्या कर्मचाऱ्यांनी पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे त्यांना व्याजावर आयकर भरावा लागेल. कर मोजणीसाठी रक्कम दोन भागांमध्ये विभागली जाईल. एकामध्ये करमुक्त योगदान आणि दुसऱ्यामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान, जे करपात्र असेल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपये असेल. येथे संपूर्ण गणित समजून घ्या

4. आधार-पॅन लिंक न केल्यास दंड
पॅनला आधारशी लिंक केल्यास आता दंड आकारला जाईल. 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड असेल. यानंतर 1000 रुपये दंड भरावा लागेल. 31 मार्च 2023 नंतरही पॅन नंबर लिंक न केल्यास तो निष्क्रिय होईल.

5. कार खरेदी करणे महागणार
टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमती 2-2.5% ने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, तर टोयोटा किर्लोस्कर मोटरने देखील आपल्या वाहनांच्या किमती 4% ने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मर्सिडीज-बेंझ इंडिया आपल्या सर्व कारच्या किमती वाढवणार आहे. BMW देखील 1 एप्रिलपासून आपल्या सर्व कारच्या किमती 3.5% ने वाढवणार आहे.

6. औषधे देखील महागणार
सुमारे 800 जीवरक्षक औषधांच्या किमतीत 10% वाढ होणार आहे. त्यात अँटिबायोटिक्स ते पेन किलर यासारख्या आवश्यक औषधांचाही समावेश आहे.

7. क्रिप्टोवर 30% कर
व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोवर 30% कर आकारला जाईल. जर एखाद्या व्यक्तीने क्रिप्टो चलन विकून नफा कमावला तर त्याला त्यावर कर भरावा लागेल. 1 जुलैपासून विक्रीवर 1% TDS देखील कापला जाईल.

8. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम बदलणार
आता तुम्ही म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी चेक, बँक ड्राफ्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पेमेंट करू शकणार नाही. म्युच्युअल फंड ट्रान्झॅक्शन एग्रीगेशन पोर्टल MF युटिलिटीज (MFU)ने 31 मार्च 2022 पासून चेक-डिमांड ड्राफ्ट इत्यादीद्वारे पेमेंट सुविधा बंद केली आहे. आजपासून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त UPI किंवा नेटबँकिंगद्वारे पैसे द्यावे लागतील.

9. वायरलेस इअरबड्स आणि रेफ्रिजरेटर होऊ शकतात महाग
2022 च्या बजेटमध्ये वायरलेस इअरबड्समध्ये वापरल्या जाणाऱ्या काही भागांवर आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, उत्पादन खर्च वाढेल, त्यानंतर सर्व ब्रँड त्यांच्या इयरबडच्या किमती वाढवू शकतात. याशिवाय हेडफोन्सच्या थेट आयातीवरील शुल्कात वाढ करण्यात आली आहे. याचा सरळ अर्थ असा की आता ग्राहकांना हेडफोन खरेदी करणे महाग होणार आहे. याशिवाय सरकारने कंप्रेसरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवर आयात शुल्क वाढवले ​​आहे. त्यामुळे देशात रेफ्रिजरेटरही महाग होणार आहेत.

10. लहान बचत योजनांसोबत बँक खाते लिंक करणे आवश्यक
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये टाईम डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना किंवा मासिक योजना यासारख्या लहान बचत योजना चालवत असाल तर ही खाती बचत खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्याशी निश्चितपणे लिंक करा. आता या योजनांचे पैसे बचत खात्यातच उपलब्ध होतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. बचत खाते लिंक केल्यावर, व्याजाचे पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केले जातील.

11. अॅक्सिस बँक बचत खात्यांचे बदलणार नियम
अॅक्सिस बँकेने बचत खात्यासाठी सरासरी मासिक शिल्लक मर्यादा 10,000 रुपयांवरून 12,000 रुपये केली आहे. AXIC बँकेने मेट्रो/शहरी शहरांमध्ये सुलभ बचत आणि समतुल्य योजनांसाठी किमान शिल्लक मर्यादा वाढवली आहे. हा बदल फक्त त्या योजनांना लागू होईल, ज्यामध्ये सरासरी शिल्लक रुपये 10,000 आहे.

12. बँक आणि डीमॅट खात्याचे केवायसी
डिमॅट आणि बँक खातेधारकांसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांनुसार, तुमचे केवायसी अपडेट न केल्यास तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. त्याच वेळी, जर तुमच्या डीमॅट खात्याची केवायसी केली नसेल तर डीमॅट खाते निष्क्रिय केले जाईल. यामुळे तुम्ही शेअर बाजारात व्यवहार करू शकणार नाही. एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तरी हे शेअर्स खात्यात ट्रान्सफर करता येणार नाहीत. केवायसी पूर्ण झाल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतरच हे केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...