आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​Case Against BJP Leaders In Case Of Forced Take Off From Deoghar, Latest News And Update

भाजप नेत्यांचे देवघरमधून जबरदस्तीने टेक ऑफ:​​​​​​​विमानतळावरील ATC कार्यालयात शिरले, भाजपच्या 2 खासदारांसह 9 जणांविरोधात तक्रार

देवघरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडच्या देवघर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रकांवर (ATC) दबाव टाकून रात्री चार्टर्ड विमानाचे टेक ऑफ केल्याप्रकरणी भाजप नेत्यांसह 9 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे, त्यांची 2 मुले, खासदार मनोज तिवारी व भाजप नेते कपिल मिश्रा यांचा समावेश आहे.

तक्रार देवघर विमानतळावर तैनात डीएसपी सुमन अमन यांनी जिल्ह्यातील कुंडा ठाण्यात नोंदवली आहे. त्यांच्या मते, 31 ऑगस्ट रोजी गोड्डाचे खासदार, त्यांची दोन्ही मुले, मनोज तिवारी व अन्य काही जणांनी देवघर विमानतळावरील एटीसी कार्यालयात जबरदस्तीने शिरून कर्मचाऱ्यांवर क्लिअरंस देण्यासाठी बळजबरी केली. त्यांनी आपल्या तक्रारीत देवघर विमानतळावर नाइट टेक ऑफ व लँडिंगची सुविधा नसल्याचेही प्रामुख्याने अधोरेखित केले आहे.

निवडणूक आयोगाने दिले डीसींना हटवण्याचे निर्देश

निवडणूक आयोगाने झारखंड सरकारला डीसी देवघर मंजूनाथ भजंत्री यांची त्यांच्या पदावरून तत्काळ हकालपट्टी करण्याचे निर्देश दिलेत. मंजूनाथ यांनी आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय डीसी/डीईओ किंवा अन्य इतरांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करू नये. आयोगाने मंजूनाथ यांच्यावर 15 दिवसांच्या आत शिस्तभंगाची कारवाई करण्याचीही सूचना केली आहे.

डीएसपीने केली 2 पानांची तक्रार.
डीएसपीने केली 2 पानांची तक्रार.
9 जणांविरोधात तक्रार दाखल.
9 जणांविरोधात तक्रार दाखल.

पायलट व एअरपोर्ट संचालक संदिप ढिंगराही एटीएसमध्ये उपस्थित होते.

  • डीएसपींनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, ते जेव्हा एटीसीच्या नियंत्रण कक्षा पोहोचले तेव्हा विमानतळाचे संचालक संदिप ढिंगरा व चार्टर्ड प्लेनचे पायलट अगोदरपासूनच तिथे उपस्थित होते. त्यावेळी चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाने एटीसी स्टाफवर दबाव टाकला. काही वेळताच खासदार व त्यांची दोन्ही मुले तिथे पोहोचले.
  • डीएसपींनी लिहिले की, दबावात त्याना क्लिअरेंसही मिळाले. त्यानंतर वैमानिक व उर्वरित सर्वजण देवघर विमानतळावरून निघून गेले.
  • डीएसपी अमन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या सर्व गोष्टी पाहून विमानतळ संचलनाच्या सुरक्षा मापदंडांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते. या लोकांनी एटीसी कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश केला. डीएसपींनी सीसीटीव्हीचा दाखला देत मुकेश पाठक, देवता पांडे व पिंटू तिवारी यांच्यावरही एटीसी इमारतीत सुरक्षा मापदंडांचे उल्लंघन करुन शिरण्याचा आरोप केला आहे.

निशिकांत यांनी साधला हेमंत सरकारवर निशाणा

या प्रकरणी गोड्डाचे खासदार निशिकांत यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आम्ही पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यावर त्यांनी एवढा मोठा वाद निर्माण केला.

पीडित कुटूंबाला भेटण्यासाठी गेले होते भाजप नेते

31 ऑगस्ट रोजी खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारी, कपिल मिश्रा देवघरच्या दुमका येथे गेले होते. ते सर्वजण दुमकातील पेट्रोल हल्ल्यात मारल्या गेलेल्या अल्पवयीन तरुणीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. दुमकात 23 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन तरुणीला तिच्या शेजारी राहणाऱ्या शाहरुख हुसैन नामक तरुणाने तिच्याच घरात पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तिचा रांची स्थित रिम्स रुग्णालयात उपचारादरम्यान 28 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...