आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात मुलांच्या संरक्षणासंबंधी विविध योजना राबवल्या जात आहेत. असे असतानाही मुले लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यापासून सुरक्षित नाहीत. मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधीच्या प्रकरणात महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. दहा राज्यांच्या यादीत महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर आहे. बाल लैंगिक शोषण होणाऱ्या ५ राज्यांमध्ये मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीचा समावेश आहे.
अहवाल वर्ष २०१९ ते जून २०२२ पर्यंतच्या प्रकरणांचा समावेश केला आहे. अहवालाचा उद्देश हे गुन्हे जास्त होणारे कोणते क्षेत्र आणि लोकांत मुलांप्रति संवेदनशीलतेची गरज दाखवण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांत मुलांच्या लैंगिक शोषणाचे एकूण ७ हजार ५९५ प्रकरणे दाखल झाले. यात एकट्या उत्तर प्रदेशात २,९७३ गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्रात हा आकडा २६१ आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.