आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cash Rupee Will Now Become 'e Rupee': India To Launch Digital Currency This Year

डिजिटल चलन:नगदी रुपया होईल आता ‘ई-रुपी’: भारत याच वर्षी लाँच करणार डिजिटल चलन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रिझर्व्ह बँक या वर्षअखेरपर्यंत आपले डिजिटल चलन ‘ई-रुपी’ लाँच करेल. हा प्रयाेग करणारा भारत जगातील पहिला मोठा देश ठरेल. सध्या बहामास, जमैका, नायजेरिया व ईस्टर्न कॅरेबियन ८ देश अशा ११ छोट्या देशांत असे चलन आहे. चीनमध्ये दाेन वर्षांपासून याची चाचणी सुरू आहे, तर अमेरिका-ब्रिटनमध्ये अजूनही संशोधनच सुरू आहे. आरबीआयनुसार, भारत पथदर्शी प्रकल्प म्हणून डिजिटल चलन लाँच करेल. विशिष्ट स्थितीत हे चलन वापरले जाईल. ही संकल्पना समजावण्यासाठी आरबीआयने माहितीही जारी केली आहे. यात उद्देश, लाभ आणि जोखीम समजावण्यात आली आहे. हे चलन सर्वात अगोदर ठोक व्यवहारांसाठीच वापरले जाणार असल्याचे सांगितले जाते. अर्थमंत्री निर्मला सीमारमण यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती.

-खिशामध्ये रोकड ठेवण्याची गरज नाही, बँकांमधील सेटलमेंट प्रक्रिया नष्ट, यामुळे व्यवहार वेगात होतील डिजिटल रुपया काय आहे? डिजिटल चलन ई-रुपी कागदी चलनाचे इलेक्ट्रॉनिक रूप असेल. हे रुपयात रूपांतरित केले जाऊ शकेल. ...मग खिशात पैसे ठेवण्याची गरज नाही? ई-रुपीमुळे लोकांना खिशात रोकड ठेवण्याची गरज नाही. हेही मोबाइल वॉलेटप्रमाणे काम करेल. हे ठेवण्यासाठी बँक खात्याची सक्ती नसेल. याचे फायदे? कॅशलेस पेमेंट करू शकू. अज्ञात व्यक्तीची माहिती शेअर करण्याची गरज पडणार नाही.प्रायव्हसी कायम राहील. सर्वात आधी रोकडवरील अवलंबित्व घटेल. प्रत्यक्ष चलन छापण्याचा खर्च घटेल. रोकड अर्थव्यवस्था घटवण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यात मदत मिळेल. देवाणघेवाणीचा खर्च घटवण्यातही मदत मिळेल. याचे वैशिष्ट्य? सामान्य नागरिक, संस्था आणि सरकारी संस्थाही वापर करू शकतील. हे व्यावसायिक बँकेशी एक्स्चेंज केले जाऊ शकेल. किती प्रकारात ई-रुपी असेल? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) दोन प्रकारची असेल. किरकोळ वापरासाठी रिटेल व घाऊक वापरासाठी होलसेल ई-रुपी. रिटेल ई-रुपीचा वापर खासगी क्षेत्र, बिगर वित्तीय ग्राहक आणि व्यावसायिकांसह सर्व करू शकतील. होलसेल ई-रुपी निवडक वित्तीय संस्थांसाठी असेल. उदा.बँक, वित्तीय संस्था आदी. मी कसा वापर करू? या वर्षाच्या अखेरीस पथदर्शी प्रकल्पात लाँच होईल. सुरुवातीस ठोक व्यवहारात वापर होईल. औपचारिक लाँचिंगनंतर सर्वसामान्य वापर करू शकतील. पंतप्रधानांनी लाँच केले होते ई-रुपी व्हाऊचर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंटच्या नव्या चाचणीच्या रूपात ई-रुपी व्हाऊचर लाँच केले होते. हे मोबाइलवर एसएमएस किंवा क्यूआर कोडच्या रूपात मिळते. उदाहरणार्थ, सरकार कर्मचाऱ्याच्या उपचाराचा खर्च उचलू इच्छित असेल तर ते या रकमेस ई-रुपी व्हाऊचर जारी करते.

डिजिटल चलन : १५ देशांत चाचणी १५ देशांत पायलट प्राेजेक्ट : चीन, रशिया, साैदी अरेबिया, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, यूएई आदी. २६ देशांत विकास जारी : भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, इराण आदी. ४६ देशांमध्ये संशोधन : अमेरिका, मेक्सिको, पाकिस्तान, नेपाळ आदी. दोनमध्ये रद्द : इक्वाडोर, सेनेगल.

बातम्या आणखी आहेत...