आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी केंद्र सरकारने कॅशलेस योजनेला अंतिम रूप दिले आहे. यात प्रत्येक जखमीसाठी दीड लाखापर्यंतचे उपचार कव्हर असेल. तसेच अपघातात जखमी व्यक्तीला लगेच दाखल करून उपचार करणे रुग्णालयांसाठी सक्तीचे असेल. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने ही योजना तयार केली आहे. ती नवीन आर्थिक वर्षापासून (२०२१-२०२२) लागू केली जाण्याची शक्यता आहे. मोटार वाहन अधिनियम-२०१९ मध्ये रस्ते अपघातात जखमींच्या कॅशलेस उपचारांची योजना तयार करण्याचे अधिकार केंद्राला देण्यात आले होते. योजनेअंतर्गत मोटार वाहन अपघात निधी उभारला जाईल. त्यातून अपघातात जखमी झालेल्यांच्या उपचारांसाठी तसेच अपघातात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्यात येईल. तसेच ‘हिट अँड रन’ अपघातात गंभीर जखमींना वेगळ्या भरपाईचीही व्यवस्था असेल. भरपाईची आणि मदतीची रक्कम केंद्र सरकार ठरवेल. ही योजना देशासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण दरवर्षी पाच लाख अपघातांत दीड लाख मृत्यू होतात आणि सुमारे ३.५ लाख लोक अपंग होतात.
अपघात निधीत तीन खाती असतील :
कॅशलेस योजनेसाठी स्थापन हाेणाऱ्या मोटार वाहन अपघात निधीत तीन खाती असतील. एक खाते त्या जखमींसाठी असेल, ज्यांचा विमा कव्हर असलेल्या वाहनात अपघात झाला असेल. या निधीसाठी देशातील सर्व विमा कंपन्या किमान निधीची तरतूद करतील. दुसरे खाते विमा नसलेली वाहने किंवा हिट अँड रन प्रकरणातील पीडितांसाठी असेल. राष्ट्रीय महामार्गावरील उपकर आणि दंडाच्या रकमेतून हा पैसा उपलब्ध होईल. तिसऱ्या खात्यातून ‘हिट अँड रन’च्या पीडितांना भरपाई दिली जाईल. यासाठीचा निधी जनरल इन्शुरन्सकडून येईल.
कॅशलेस उपचारातील प्रमुख मुद्दे
> अपघातात जखमी व्यक्तीला त्वरित दाखल करून उपचार करणे रुग्णालयांसाठी आवश्यक असेल.
> जखमी पूर्णपणे बरा होईपर्यंत कॅशलेस उपचार सुरू राहतील.
> जखमीला रुग्णालयात आणणे किंवा दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याच्या खर्चाचाही यात समावेश असेल.
> प्रत्येक जखमीसाठी दीड लाख रुपयांपर्यंत उपचार.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.