आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:प्रलयंकारी पाऊस : केरळमध्ये डोंगर चिरून तयार झाली नदी, हिमाचल-उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी

तिरुवनंतपुरम/ नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमध्ये रविवारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रलयंकारी पाऊस आणि भूस्खलनाच्या विध्वंसाचे चित्र समोर येत आहे. राज्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता आहेत. सैन्यदल, हवाई दल व नौदलासह एनडीआरएफ बचावकार्य करत आहे. एनडीआरएफने ८ महिला व ७ मुलांसह ३३ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हवामान खात्याने म्हटले की, हळूहळू पाऊस कमी होईल. इडुक्कीच्या पिरुमेडूत शनिवारी ११ इंचांवर पाऊस झाला.

कोट‌्टायममध्ये भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या नदीत अनेक घरे बुडाली.
- कोट्टायम, इडुक्की, पथनमथिट्टा जिल्ह्यातील डोंगरी भागात २०१८- २०१९ मधील पुरासारखी स्थिती.
- २ तासांत २ इंचांपेक्षा जास्त पाऊस. त्यावरून केरळमध्ये ढगफुटी झाल्याचा कोचिन विद्यापीठाचा दावा.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा.
- हिमाचल : रोहतांग, लाहौल स्पिती, मनालीच्या शिखरांवर बर्फवृष्टी

२१ जणांचा मृत्यू, तज्ज्ञांचे मत-ढगफुटीमुळे पाऊस
- हिमाचल प्रदेशच्या पर्वतीय भागांत हिमवृष्टी. पर्वतीय भागांत थंडी वाढली.
- सिमल्यासह मैदानी भागांत रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता.
- उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बर्फवृष्टी, सोमवारी शाळांना सुटी, ट्रेकिंग बंद.
- दिल्लीतही रविवारी जोरदार पाऊस. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली.

बातम्या आणखी आहेत...