आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Catholic Father, Nun Convicted In Sister Abhaya Murder Case, Sentenced After 28 Years

तिरुवनंतपुरम:सिस्टर अभया हत्येप्रकरणी कॅथॉलिक फादर, नन दोषी, 28 वर्षांनंतर निकाल, आज शिक्षा सुनावणार

तिरुवनंतपुरमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमधील बहुचर्चित सिस्टर अभया हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने कॅथॉलिक फादर आणि एका ननला मंगळवारी दोषी ठरवले. सिस्टर अभयाचा (२१) मृतदेह १९९२ मध्ये कोट्टायमच्या सेंट पीयूस काॅन्व्हेंट शाळेच्या विहिरीत आढळला होता. या प्रकरणात २८ वर्षांनी निकाल लागला. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे. सनल कुमार यांनी दोन्ही आरोपी फादर थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफीला दोषी ठरवले आहे. दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. बुधवारी शिक्षेची सुनावणी होईल. या प्रकरणातील दुसरे आरोपी फादर पुथराकयाल यांना आधीच पुराव्यांअभावी मुक्त करण्यात आले आहे. ते अभयाच्या महाविद्यालयातील सहविद्यार्थी होते.

अभयाच्या आई-वडिलांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मार्च १९९२मध्ये विहिरीत अभयाचा मृतदेह आढळला होता. फिर्यादीनुसार अभयावर कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला करण्यात आला होता. ती काही अनैतिक कारवायांची साक्षीदार होती, ज्यात तीनही आरोपींचा सहभाग होता. २००८मध्ये सीबीआयने हे प्रकरण आपल्या हातात घेतले.

बातम्या आणखी आहेत...