आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:अजित पवारांच्या नातेवाइकांकडे 184 कोटींची बेहिशेबी संपत्ती, सीबीडीटीने जाहीर केली छाप्यातील रक्कम

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर विभागाने मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांवर तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही नातेवाइकांवर टाकलेल्या छाप्यांत सुमारे १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची माहिती बाहेर आली असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शुक्रवारी जाहीर केले.

मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणांवर ७ ऑक्टोबरला छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान मिळालेल्या पुराव्यांनुसार बेहिशेबी संपत्ती तसेच व्यवहारांची माहिती बाहेर आली असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. कुणाचेही नाव न जाहीर करता सीबीडीटीने म्हटले आहे की, दोन्ही समूहांच्या १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाची माहिती देणारे दस्तऐवज या छाप्यात सापडले आहेत.

या छाप्यांत २.१३ कोटींची बेहिशेबी संपत्ती, ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या छाप्यांत काही कंपन्यांच्या बेहिशेबी आणि संशयास्पद व्यवहाराचीही माहिती बाहेर आली आहे. बनावट शेअर प्रीमियम, कर्ज आणि इतर काही सेवांसाठी अवास्तव आगाऊ रक्कम देऊन करार करून ही बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचे निदर्शनास येत असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...