आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBI Arrests 20 People, Runs WhatsApp Group Called 'Only Child Sex Video'; Most Cases Are In Tamil Nadu

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरण:सीबीआयने 20 जणांना घेतले ताब्यात, 'ओन्ली चाइल्ड सेक्स व्हिडिओ' या नावाने चालवत होते व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप; सर्वाधिक केसेस तामिळनाडूत

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात मंगलवार देशभरातील सुमारे 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 77 शहरांमध्ये सीबीआयने छापेमारी केली. त्यात 20 पेक्षा जास्त आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अन्य काही जणांसोबत विचारपूस सुरू आहे.

सीबीआयने केलेल्या छापेमारी मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफीशी संबंधित पुरावे आढळले आहेत. चौकशीदरम्यान लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि पोर्नोग्राफीसाठी वापरण्यात येत असलेले काही वस्तू मिळाल्या आहेत. मंगळवारी सीबीआयने 10 जणांना ताब्यात घेतले होते.

त्यानंतर बुधवारी पुन्हा आणखी 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, ताब्यात घेण्यात आलेल्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यातील काही जणांना पोलीसांनी ताब्यात देखील घेतले आहे. चौकशीदरम्यान असे स्पष्ट झाले आहे की, भारताच्या या पोर्नोग्राफी जाळ्यांचे नेटवर्क 100 देशांसोबत कनेक्ट आहे. त्यात अनेक देशांचे नावे देखील समोर आले आहे.

चाइल्ड पोर्नोग्राफीचे सर्वाधिक प्रकरण तामिळनाडूत
14 नोव्हेंबर रोजी चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात 83 जणांविरोधात 23 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. सीबीआयने मंगळवारी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यामध्ये तामिळनाडुचे 6, उत्तर प्रदेश आणि बिहारचे 4, राजस्थान-महाराष्ट्र-हरियाणाचे 3, ओडिसा-पंजाबमधले 2, छत्तीसगढ़-दिल्ली-मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील 1 जण सामील आहे.

सध्याचे कायदे पोर्नोग्राफी रोखण्यात अपयशी
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि सायबर कायदा तज्ञ पवन दुग्गल यांनी सांगितले की, 2000 मध्ये जेव्हा माहिती तंत्रज्ञान कायदा लागू करण्यात आला, तेव्हा चाइल्ड पोर्नोग्राफीचा या कायद्यात समावेश नव्हता. 2008 मध्ये दुरुस्ती करून ते जोडण्यात आले.

त्याचे उत्पादन, प्रकाशन आणि प्रसारण याबाबत कायदे करण्यात आले होते, ज्यामध्ये 5 वर्षे तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद आहे, त्यातील कलमे अजामीनपात्र आहेत. चाइल्ड पोर्नोग्राफी ही देशात खूप मागणी असलेली बाजारपेठ बनली आहे. सध्याच्या कायद्याने हे थांबवणे अशक्य आहे. यामध्ये काटेकोरपणे बदल घडवून आणावे लागतील.

अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये लागू केलेल्या चिल्ड्रन्स ऑनलाइन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्ट (COPPA) सारख्या कायद्यांची भारतात गरज आहे. ज्यात बालकांचे हक्क, संरक्षण, कायदेशीर आणि कल्याणाशी संबंधित लाभांचा काटेकोरपणे समावेश आहे. कोरोना आल्यापासून चाइल्ड पोर्नोग्राफीचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सीबीआयची कारवाई हा पॉर्नोग्राफी थांबवण्याच्या दिशेने एक मोठा प्रयत्न आहे.

पोलिसांनी सीबीआय टीमची केली सुटका
ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील एका गावात छापा टाकण्यासाठी गेलेल्या सीबीआय पथकावर स्थानिकांनी हल्ला केला. सीबीआय टीमवर हा हल्ला करण्यात आला जेव्हा टीमने ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित एका प्रकरणात एका व्यक्तीच्या घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला. सीबीआय टीमवर झालेल्या हल्ल्याची माहिती पोहोचलेल्या स्थानिक पोलिसांनी त्यांना जमावापासून वाचवले.

बातम्या आणखी आहेत...