आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBI । CBI Cracks Down On Online Child Pornography Cases, Raids In 76 Cities In 14 States And Union Territories

मोठी कारवाई:ऑनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, देशातील 76 शहरांमध्ये केली छापेमारी; 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश

संदीप राजवाडे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात सीबीआयने देशातील सुमारे 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सुमारे 76 ठिकाणी छापा टाकला आहे. तपास यंत्रणेने 14 नोव्हेंबरला 83 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनेच्या पथकाने छापा मारलेल्या राज्यात आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचा सहभाग आहे.

लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी सीबीआयची 76 ठिकाणी छापेमारी

लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांनी शेअर व प्रसारित केल्याप्रकरणी सीबीआयने आज देशातील 76 ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबरला याप्रकरणात 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 83 जणांविरूद्धात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ आघाडीवर

एनसीआरबी 2020 च्या रिपोर्टनुसार चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात काही राज्य आघाडीवर आहे. त्यात उत्तर प्रदेशात 161, महाराष्ट्रात 123, कर्नाटकात 122 आणि केरळमध्ये 101 चाइल्ड पोर्नोग्राफी गुन्हे दाखल झाले आहे. यासोबतच ओडिसामध्ये 71, तामिळनाडूत 28, आसाम 21, मध्यप्रदेश 20, हिमाचल प्रदेश 17, हरियाणा 1, आंध्रप्रदेश 15, पंजाब 8 आणि राजस्थानमध्ये 6 गुन्हे दाखल आहेत. यापैकी आज केरळ व कर्नाटक वगळता बाकीच्या राज्यात सीबीआयने छापेमारी केली आहे. यासोबतच गुजरात आणि दिल्ली देखील चौकशी सुरू आहे.

सीबीआयने दिली दिव्य मराठी डॉट कॉमला माहिती

सीबीआयचे अधिकारी आरसी जोशी यांनी दिव्य मराठी डॉट कॉमला सांगितले की, आज सकाळपासून सीबीआयचे पथक देशातील 14 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 76 शहरांमध्ये सर्चिंग ऑपरेशन करत आहे. दोन दिवसांपुर्वीच सीबीयाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आज सकाळी आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी छापा मारण्यात आला. देशातील सुमारे 14 राज्यांमध्ये ही कारवाई केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील दोन-तीन मोठ्या शहरात छापेमारी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...