आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपपत्र:साेनाली फाेगाट यांना बळजबरीने ड्रग्ज दिल्याचे सीबीआयचे आरोपपत्र

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री व हरियाणा भाजपच्या नेत्या साेनाली फाेगाट यांना २३ आॅगस्ट राेजी मृत्यूच्या काही तास आधी ड्रग्ज देण्यात आले हाेते. त्यांचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर त्यांच्यावर ड्रग्जसाठी बळजबरी केली हाेती. सीबीआयने गाेव्यातील मापुसा न्यायालयात दाखल केलेल्या आराेपपत्रात हा आराेप केला आहे. साेनाली फाेगाट २२ आॅगस्ट राेजी सुधीर व सुखविंदर यांच्यासाेबत गाेव्यात आल्या हाेत्या. त्या अंजुना हाॅटेलमध्ये उतरल्या हाेत्या. प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना २३ राेजी सकाळी सेंट अँथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला हाेता. प्राथमिक तपासात त्यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पाेलिसांनी केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...